पुण्यात ..! कायदेशीर कामकाजाच्या नावाखाली ‘वकीला’ कडून वृध्द दाम्पत्यांना करोडोचा गंडा…! भाग -1
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : समाजाचे देणेकरी म्हणून गरीब, गरजू लोकांसाठी कार्य करणारे निस्वार्थ लोक आजही आहेत पण काही गलिच्छ मनोवृत्तीचे लोक गरीब लोकांच्या हक्कावरही लाळ गळायला कमी करत नाही..अशीच एक घटना पुण्यातली … परदेशी एक वयोवृद्ध दाम्पत्य सुरवातीपासूनच समाजासाठी कार्यरत असणारे..गोर गरीबांची आर्थिक मदत असो वा गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना देणगी देणे असो कोठेही प्रथम स्थांनी असणारे ह्या दाम्पत्यांनी आपले मूल होऊ शकत नाही याची जन्मभर खंत मनाशी लावून न ठेवता २ मुलींना दत्तक घेऊन आपल्या मुलीनं प्रमाणे त्यांचा सांभाळ केला आणि गरीब मुलांकरिता शाळा उघडण्याची खटपट सुरू केली सुरवातीला छोट्याश्या जागेत आपल्या स्वप्नाला साक्षात्कार देत ३०-४० मुलांसह मोफत क्लासेस देणे सुरू केले आता या दाम्पत्यांना शासनाच्या नियमात अधिकृत शाळा निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले…त्यातच हे दांपत्य देणगी देत असलेल्या एका सामाजिक संस्थेत कार्यरत असणाऱ्या त्या तथाकथित प्राणी प्रेमी इसमा सोबत या दाम्पत्याची ओळख झाली आणि या इसमाने त्या दांपत्या सोबत बोलचाल वाढवली, आपण परदेशी असल्याने येथील नियम, कायदे, शासकीय कार्यालय यांच्या अजानतेमुळे मुळे शाळा उभारण्यात येणाऱ्या अडचणीची वाच्यता त्यांनी या इसमा समोर केली, आपले स्वप्न आणि अडचणी सांगितल्या…ज्या नंतर पैसे कमविण्याची चांगली संधीच आपल्याला मिळाल्या प्रमाणे या इसमाने या दांपत्याला मी तुम्हाला शासकीय कामकाज आणि शाळा उभारण्यासाठी मदत करू शकतो मी वकील असल्याचे सांगत या दाम्पत्यांसोबत वेगवेगळे करार (POA) तयार करून शाळेसाठी जमीन घेण्यासाठी जागेची परवानगी मिळवण्यासाठी म्हणून आधी लाखो आणि नंतर करोडो रुपयाची मागणी केली जी मागणी या दाम्पत्यांना आपले स्वप्न साक्षात उतरत असल्याचे संभ्रम मनात ठेऊन पूर्ण ही केली…आणि ह्यामुखवट्या धारी इसमाने कवड्या मोलाच्या जमिनी बदल्यात या दाम्पत्यांकडून अव्वा की सव्वा किंमत लुबाडली आणि त्या जागेवर पत्र्याच्या शेड टाकून ही तात्पुरती शाळा, पालिकेने मंजुरी दिली की पक्की शाळा बनवू अश्या खोट्या आश्वासनावर लुबडलेल्या पैशांवर मजा करत आहे….खरी बाब तर आता समोर आली…जेव्हा महानगरपालिके कडून या दाम्पत्यांना नोटीस आली… तुम्ही खरेदी केलेली जमीन आणि त्यावर बांधलेले शेड हे अनधिकृत आहे…ज्याचा जाब जेव्हा दांपत्याने या समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या इसमाला विचारले तेव्हा ‘ ते तुम्ही तुमचं पाहा..पुन्हा पैशा बाबत मला विचारले तर परिणाम वाईट होईल, उलट तुम्ही मला पैसे देणे आहात म्हणून नोटिसा पाठविणाऱ्या या भामट्या विरोधात मदतीसाठी या वृध्द दांपत्याने झालेल्या फसवणुकीचा कल्पना देऊन मदतीसाठी” खादी एक्सप्रेस” चे संपादक आणि ” इंटरनॅशन ह्युमन राईट्स”च्या अध्यक्षांकडे धाव घेतली…अश्या भमट्या, लबाड आणि विश्वासघाती माणसांमुळे माणुसकीला काळीमा फासली जात आहे, म्हणून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊच खादी एक्सप्रेस” चे संपादक, आणि ” इंटरनॅशन ह्युमन राईट्स”च्या अध्यक्षांनी या तथाकथित समाजसेवी वकिलाचे खरे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी विडा उचलला आहे आणि त्यासाठी या दाम्पत्यांना खादी एक्सप्रेस चे संपादक यांना आपले कुळमुखत्यार म्हणून नेमून कायदेशीर बाजू भक्कम केली आहे ज्यातून लवकरच ” खादी एक्सप्रेस” या पुढील प्रकाशनात आपल्या समोर या माणसाची सर्व खरी माहिती, त्याचा फोटो, सोबतच या दांपत्यांची मुलाखत प्रकाशित करणार आहे..जेणे या पुढे भविष्यात चांगले लोक यां भमट्याच्या जाळ्यात अडकणार नाही…परिणामी फसवणुक करणाऱ्याची कायद्याने अशीही कंबर मोडता येते याची कल्पना अश्या भामट्यांना मिळेल…..