पुणे – ७४ व्या मोक्क्यात खडकीतील सागर चांदणे टोळी…४ जन अटकेत तर आणखी ७…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुण्यातील विविध भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ७३ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली असून सदर ७४ वी मोक्का कारवाई अंतर्गत खडकी येथील सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे.दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चतुःश्रृंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करुन घरी जात असताना फिर्यादी यांना सागर दत्ता चांदणे व त्याचे इतर १० साथीदार यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन ” तुझा मर्डर करतो असे म्हणुन त्याचे हातातील धारधार शस्त्राने फिर्यादी यांना जीवे मारणेच्या उददेशाने फिर्यादी यांचे डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले व हातामधील शस्त्र हवेत फिरवून कोण मध्ये पडला तर त्याला पण मारून टाकेन असे बोलून धमकी दिली त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु. रजि. नं. ७५१/२०२३ गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी नामे १) सागर दत्ता चांदणे ( वय २४ वर्ष) रा. खडकी बाजार पुणे (टोळी प्रमुख) २) यश ऊर्फ मोन्या प्रविण गोपनारायण (वय १९ वर्ष), रा खडकी बाजार पुणे ३) ॠषी किरण बिवाल, (वय १९ वर्ष), रा. खडकी बाजार पुणे ४) आयुष ऊर्फ बंटया नागेश लांडगे, (वय १९ वर्ष ) रा. खडकी बाजार, पुणे. (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली असुन इतर ७ आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपीचे पुर्व रेकॉर्ड पाहणी करीता आरोपी सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदारासह त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने, भोसरी व चतुःश्रृंगी या भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणेचे उददेशाने गुन्हेगारी टोळी तयार करून सदर भागातील लोकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, लुटालुट करणे, ई. गुन्हे केले आहेत.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल