पुणे स्टेशन|६ वर्षीय चिमुरडीरचे अपहरण करून बलात्कार -” पुणे हे विद्येचे माहेरघर की नराधमांचे ?”

पुणे ( खादी एक्सप्रेस प्रतिनिधी): रात्रीच्या सुमारास आई जवळ झोपलेल्या अवघ्या ६ वर्षीय चिमुरडीचा अपहरण करून तिच्या वर बलात्कार केल्याची घटना पुणे स्टेशन जवळ रात्रीच्या सुमारास घडली . १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्काराची घटना घडून ८ दिवसही झाले नाही तर ही लज्जास्पद आणि घृणा निर्माण होणारी घटना समोर आली आहे.
पुणे स्टेशन जवळ रात्रीच्या सुमारास आई जवळ झोपलेल्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे ३९ वर्षीय रिक्षा चालकाने अपहरण केले . तिला घेऊन तो नराधम मार्केट यार्ड जवळ गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मध्य रात्रीच्या सुमारास आईच्या लक्षात आले की आपली मुलगी जवळ नाही तिचा शोध घेण्यात आल्या वर ती सापडत नसल्याने मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्टेशन जवळ धाव घेतली . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बंद गार्डन पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि शोध मोहीम सुरू केली . सी सी टी वी मघ्ये आरोपीने मुलीला मार्केट यार्ड जवळ नेताना चे फुटेज मिळताच पोलिसानी आपले पथक मार्केट यार्ड च्या दिशेने वळवले . मार्केट यार्ड जवळून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या . मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या घटने मध्ये दिवसेंदिवस वाढच होत असे पुणे सारख्या शहरात अश्या घटना होत आहे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. अश्या घटने मधून दिसते की अश्या नराधमांना पोलिसांची काहीही भीती राहिलेली नाही ,कुठे तरी कायदीय न्यायव्यवस्था कोलमडत आहे . या घटने मुळे पुण्यातील लोकांमध्ये आक्रोश निर्माण झालेले आहे लवकरात लवकर कारवाई करून ” नराधमांना फाशीच द्या ” ही मागणी पुणेकरान कडून केली जात आहे .

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल