पुणे..! ससुन रूग्णालय प्रकरण…पिडित व्यक्तिकडुन आत्मदहनाचा इशारा…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : ससुन सर्वोपचार रूग्णालय व बी.जे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथील चतुश्रेणी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिने आपल्यावर सदर रूग्णालयातील संबंधित डॉ. विजय जाधव, डॉ. अजयतावरे, संजीव ठाकुर (नवीन अधिष्ठाता) धोंडीराम काटकर (प्रशासकिय अधिकारी),दयाराम कचोटिया (क्लार्क) यांच्या कडुन होत असलेल्या जाचाला आणि संबंधित तक्रारीची पोलिस प्रशासनाकडुन होणारी उधळपटटीला कंटाळुन अखेर प्रशासन आणि अधिकारी यांच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देत तसे पत्र जाहीर केले आहे.
नेमके प्रकरण की
ससुन सर्वोपचार रुग्णालय व बी.जे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, पुणे या ठिकाणी धीरज नानकचंद वाल्मिकी, व त्याची आई नामे श्रीमती शिला नानकचंद वाल्मिकी हया सदर रूग्णालयात चतुश्रेणी पदावर कार्यरत आहेत. सन २०२० दरम्यान श्रीमती शिला वाल्मिकी ज्या सदर रूग्णालयात मागील ३० वर्षापासुन कार्यरत आहेत त्यांना टी.बी, आणि कारोना १९ ची लागण झाल्याने त्या मागील २ वर्षा पासुन उपचार घेत असल्या कारणाने कामावर रुजु होवु शकल्या नाही ज्याची माहिती धीरज याने सदर रूग्णालयातील संबंधित व्यवस्थापकांना दिली होती. श्रीमती वाल्मिकी यांच्या उपचारानंतर त्यांना पुन्हा कामावर रूजु करून तसेच त्यांच्या अडीच वर्षाचा पगार देणेकामी डॉ. विजय जाधव यांनी धीरज वाल्मिकी यांना २०,००० /- रूपयांची मागणी केली ज्या गोष्टीला धीरज वाल्मिकी यांनी नकार दिला असता त्यांना जाती वाचक शिवीगाळ आणि त्रास देण्यास सुरवात केली असे धीरज वाल्मिकी यांनी सदर पत्रात नमुद केले आहे. आपल्या सोबत घडत असलेल्या अन्याया विषयी पोलिस विभागात तक्रारी देवुनही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही उलटपक्षी धीरज यांच्या घरावर गुंडामार्फत हल्ला चढवणे, धमक्या देणे असे प्रकार घडत असल्याने “मी या सर्व त्रासाला कंटाळुन दि. ०४/०५/२०२३ रोजी सकाळी १० ते ५:३० वाजता ससुन सर्वोचार रूग्णालय पुणे येथील मुख्य प्रवेशद्वारा समोर आत्मदहन करणार आहे, ज्यास सर्वस्वी जबाबदार डॉ. विजय जाधव,डॉ अजय तावरे, डॉ. विनायक काळे (अधिष्ठता) यांना धरण्यात यावे” असे धीरज यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याया निषेधार्थ आत्मदहन पत्रिकेत नमुद करून अश्याप्रकारच्या अन्यायास बळी पडत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना अन्याया निषेधार्थ संघटीत होणे संबंधि सहकार्या साठी निवेदन केले आहे.