पुणे : समूळ उच्चाटनातील ६८ व्या मोक्क्यात आयुष ऊर्फ बंटी विठ्ठल चव्हाण टोळी…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन, लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश मिळताच एक्सप्रेस स्पीड ने चतु:र्शृंगी पोलिसांनी धमाकेदार कारवाई करत ६८ व्या मोक्का कारवाईला अंजाम देत आयुष ऊर्फ बंटी विठ्ठल चव्हाण (टोळी प्रमुख), सह ३ साथीदारांनी अटक करण्यात आली आहे.दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादी हे त्यांच्या गाडीवरून, पत्रकार नगर परिसरातून जात असताना आयुष ऊर्फ बटी चव्हाण यांचे गाडीला फिर्यादी यांचे गाडीचा कट लागलेने आयुष याने रस्त्यात गाडी थांबवून फिर्यादी यांचे जवळ येवून माझे गाडीला कट मारतोस का असे म्हणुन त्याच्या ॲक्टीव्हा गाडीचे डिकीतील धारवार हत्याराने फिर्यादी यांचे उजवे तळहातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच आयुष सोबत असले ०३ साथीदार यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.नमुद आरोपी आयुष ऊर्फ बंटी चव्हाण (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी करून गुन्हे केलेले असून त्यांनी अवैध मार्गाने अर्थिक व इतर फायदा मिळवण्याच्या उददेशाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत, दरोडा व नागरीकांच्या मालमत्तेचे तोडफोड करुन नुकसान करणे, सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवार केल्यानेचतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर ६४२ / २०२३. भा. दं.वि. कलम ३०७,३२६, ३२३, ३४१, ५०४,३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) ३ (४) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परी ४. पुणे श्री. शशीकांत बोराटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस स्टेशन श्री. बालाजी पाढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जगन्नाथ जानकर, निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, संतोष कोळी, पोलिस अमलदार, अमित गद्रे व सुहास पवार यांनी केली आहे.