पुणे – लोहगावात मध्यरात्रीच्या ‘त्या’ कोयता दहशत….. तोडफोड थरारा नंतर….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :पुणे पोलिसांच्या गुन्हेगारी रोखण्याच्या अफाट प्रयत्न आणि ऍक्शन मधूनही कोयता गँग राहून राहून रीऍक्शन देताना दिसतेय….तोच काल मध्यरात्री (०६ नोव्हेंबर, मंगळवार) काही टोळक्याने लोहगाव येथील कलवडवस्ती मध्ये बडी मस्जिद गल्ली पासुन ते दत्त मंदीर चौक व दत्त मंदीर चौक ते खेसे पार्क रोड वर पार्क असलेल्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी अशा एकुण २५ गाड्यांची कोयत्याने तोडफोड करुन दहशत माजवल्या ने कायदा आणि सुव्यवस्थेला एकच प्रश्न निर्माण झाला…पण विमानतळ पोलीसांनी देखील या दहशत माजवणाऱ्या टोळीला चांगलाच दणका देत ताब्यात घेतले आहे वरील प्रकारची माहिती मिळताच तपास पथकाने ऍक्शन मोड घेत आरोपीच्या शोधाची सत्र फिरवली अन आरोपींचा शोध सुरू केला, आणि बातमी मिळताच कलवडवस्ती येथील मोकळ्या मैदाना मधील झाडीमध्ये लपुन बसलेले सदर गुन्ह्यातील आरोपी नामे हाशिम खलील शेख ( वय १८) . लेननंबर २, विकासनगर कॉलनी, कलवडवस्ती लोहगाव पुणे व त्याचे दोन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून एक लोखंडी हत्यार, एक सत्तुर व एक मोटार सायकल जप्त करण्यात आले असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद्रकुमार वारंगुळे हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव खोबरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता माळी, सपोनि विजय चंदन, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, राकेश चांदकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, सचिन जाधव, शैलेश नाईक, ज्ञानेश्वर आवारी यांनी केली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल