पुणे – रेकॉर्डवरची दोस्ती …लाखोंचा दरोडा…मित्राच्या जामीनासाठी केले असे काही…पुणे पोलिसांनी शिफातिने केले जेरबंद…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : जेल मधली मैत्री …सुटका..जामीन..दरोडा…जित्याची खोड काही जात नाही, कोथरुड मधील या आगळ्या वेगळ्या मैत्रीची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे, मित्राच्या जामीनासाठी दरोडा टाकून मित्राला जेल मधुन बाहेर आणले आणि दोघांनी मिळून लाखो रुपयाची चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरू केले…सदर दोन्ही रेकॉर्डवरील आरोपींना पुणे पोलिसांनी आखेर शिफातीने जेरबंद केले…आरोपी १ ) अंकुश राम गोणते, वय-३२ वर्षे, रा. स.नं. १११, दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे २) हर्षद गुलाब पवार, वय ३० वर्षे, रा. सर्व्हे नं. १११, दत्तनगर, सुतारदरा कोथरुड, पुणे असे अटक आरोपींची नावे असून यातील आरोपी अंकुश गोणते हा खुनाच्या गुन्हयात जेल मध्ये होता, त्यादरम्यान त्याची ओळख अट्टल घरफोडी चोर हर्षद गुलाब पवार याचे सोबत झाली आणि दोघांनी मिळून बाहेर पडल्यावर काय काय गुन्हे करायचे याचे नियोजन केले… ठरल्या प्रमाणे आरोपी अंकुश गोणते याने त्याचा जेल मधील साथीदार हर्षद पवार याला जामीनावर सोडण्यासाठी घरफोडी, चोरी केली आणि हर्षद गुलाब पवार यांस जामिनावर सोडवून दोघांनी मिळून पुणे शहर तसेच सातारा जिल्हा येथे घरफोडी चो-या लाखो रुपयांची घरफोडी, चोरी चे सत्र सुरू केले….सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६५/२०२३. भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयाचा तपास, युनिट-२ प्रभारी अधिकारी श्री. नंदकुमार बिडवई याचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार, संजय जाधव, अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण अशी टिम तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. वरिष्ठांच्या सुचना मिळताच पोलिसांनी आपले सत्र फिरवले आणि मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे वरील दोन्ही आरोपींना अटक करून करून जेरबंद केले असून आरोपी अंकुश गोणते यांस दाखल गुन्हयात भा.द.वि. कलम ४११ प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे. आरोपी कडून दाखल गुन्हयातील ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इत्तर गुन्हयातील १४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी, लोखंडी कटावणी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन, स्कु-ड्रायव्हर असा सर्व मिळुन १२,०१,६३२ /- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हयाचे व्यतरिक्त इतर ०४ गुन्हे असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर, सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार, गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, नागनाथ राख, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, मोहसिन शेख, निखिल जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, उत्तम तारु, विनोद चव्हाण, नामदेव रेणुसे यांनी केलेली आहे..

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल