पुणे – मोक्क्याच्या यादीत ७०वी एंट्री…हडपसर पोलिसांनी अखेर अमोल आडेगावकरवर…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : हडपसर परिसरात नवनवीन जन्म घेणाऱ्या “भाई ” मुळे परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत संपायला काही तयार नाही…’धक्का लागी कोयता, चोरी, मारामारी, उगाचची भाईगिरी याचे वाढते प्रमाण आणि या संबंधीचे दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, हडपसर पोलिस स्टेशन (गु.र.नं. १४१५/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३९५, १२०(ब), ३४ अन्वये) गुन्हे शाखा , पुणे शहर असे समांतर तपास करीत असताना युनिट-०५ गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे बातमीरादारामार्फत मिळालेल्या बातमीवरून हडपसर भागात टोळी निर्माण करून दहशत माजविनाऱ्या १) अमोल बाळासाहेब आडेगावकर वय ३० वर्षे रा. म्हसोबा कॉलनी, गोपाळपट्टी मांजरी बु पुणे (टोळी प्रमुख) (२) रोहन भगवान थोरात वय २० वर्षे रा. गोपाळपट्टी मांजरी बु. ता.हवेली जि.पुणे (३) गणेश गौतम कोरडे वय २२ वर्ष रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली जि. पुणे. (४) आशितोष विक्रम गजरे वय २२ वर्षे रा.स.नं.५. झेड हाईटस, कल्याणी स्कुलजवळ, रंगीचा ओढा, मांजरी पुणे (५) मंगेश गणेश मोरे, वय २२ वर्षे रा.स.नं.५. झेड हाईटस, कल्याणी स्कुलजवळ, रंगीचा ओढा, मांजरी पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहेनमुद आरोपी अमोल बाळासाहेब आडेगावकर (टोळी प्रमुख) याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून त्यांनी हडपसर, मांजरी, या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी तसेच इतर साथीदारांसह मालमत्ते विरुध्दचे तसेच शरीरा विरुध्दचे गुन्हे त्यामध्ये खुन करणे, घातक शस्त्र बाळगुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घरफोडी चोरी करणे, जबरी चोरी करणे, नागरीका मध्ये दहशत निर्माण करणे, येणारे-जाणारे लोकांना हत्यारे दाखवुन त्यांचेकडे पैशाची मागणी करणे, एकत्रित पणे छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करणे गंभीर गुन्हे वारंवार करीत होते, त्याने व त्याचे टोळीतील सदस्यांनी हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करून पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले, आरोपी विरोधात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii). ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करून, मान्यते प्रमाणे सदर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या ७०व्या मोक्का कारवाई मुळे परिसरातील टोळींच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल