पुणे – मोक्का कारवाईत मिरेकर अन् टोळीवर ऐंशी….. हडपसर पोलिसांची कारवाई….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : धारदार लोखंडी हत्यारांनी वार, खुनाच्या प्रयत्न, चोरी, खंडणी, परिसर दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे करणारी बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारांना ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांनी ८० वी मोक्का कारवाई पार पडली आहे, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने (हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४०६ / २०२३) सदर टोळीने संगनमत करून, पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांचेकडील धारदार लोखंडी हत्यारांनी फिर्यादी यांच्या मुलांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन त्यास जीवे ठार केले व धारदार हत्यारे हवेत फिरवुन आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर असाच एका-एकाचा मुडदा पाडू असे जोर-जोरात बोलुन सदर परीसरात दहशत पसरवली होती, दाखल गुन्ह्याच्या तपासानंतर सदर आरोपीवर आणखीनही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली त्या अनुषंगाने हडपसर पोलिसांनी सापळा लावुन दाखल गुन्हयातील निष्पन्न झालेले आरोपी १) बाबु नामदेव मिरेकर, ( वय ५४) रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे ( टोळी प्रमुख), २) आकाश हनुमंत कांबळे, (वय २० वर्ष), ३) अमन नवीन शेख, (वय २३ वर्ष, ) रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे, ४) सरताज नबीलाल शेख, (वय २० वर्ष) रा. वैदवाडी, हडपसर, पुणे ५) सनी रावसाहेब कांबळे, (वय २३ वर्ष) रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी पुणे ६) रोहित शंकर हनुवते, ( वय २२ वर्षे), रा. नवीन म्हाडा बिल्डींग, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) यांना अटक केलेली असुन, तीन विधीसंघर्षीत बालके ताब्यात घेतली आहेत.दाखल गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२).. ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांनी पोलीस उप आयुक्त, परि ०५, पुणे, श्री विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.