पुणे – मुंढवा परिसरातील दहशतगारांवर एमपीडीए …विमाननगरचा अट्टल गुन्हेगार फिरोज स्थानबध्द…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : चढती पायरी धरलेल्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे आणखीन एक एमपीडीए कायद्याचा दणका देत, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पुणे पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत मुंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे फिरोज मोहंमद शेख, वय २८ वर्षे, रा. लेन नं. ५, होम नं. २२ म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगारा विरुद्ध कारवाई करण्यात आली असून, नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दते चे आदेश पारित करण्यात आले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ही स्थानबध्दतेची ५२ वी कारवाई आहे, अट्टल गुन्हेगार नामे फिरोज मोहंमद शेख, वय २८ वर्षे, रा. लेन नं. ५, होम नं. २२ म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह मुंढवा, चंदननगर, विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न सरकारी नोकरास आपखुषीने दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेतत्याच्या या विघातक कृत्यामुळे त्याची शहरात दहशत निर्माण झाली होती.तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते, त्याच्या गुन्ह्याचा आलेख तख शहरात वाढत असलेली दादागिरी, गुंडगिरी बघून त्याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन पुणे व श्री. ए. टी. खोबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. राजु बहिरट, पोलीस उप निरीक्षक पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी सदरची कामगिरी पार पाडलीकाय आहे एमपीडीए कायदा? महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. परंतु कारवाईनंतर त्याला पोलिस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल