पुणे – बस प्रवाश्यांचे आरोपी अन् रेकॉर्डवरील चोर आखेर पोलिसांच्या ताब्यात…..

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पी. एस. पी. एल मधुन प्रवाशांचे पाकीट , पर्स , महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे चोरीस जाण्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने पुणे पोलिसांनी सदर प्रकरणाची प्रथम दखल घेवुन या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आपले पथक नेमुन युध्दपातळीवर चोरट्यांचा शोध सुरू केला.

त्यातच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयाच्या तपासकामी मा. पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शक सुचना व आदेशाप्रमाणे दाखल गुन्हयाचे तपासकामी पोलीस उप निरीक्षक शेख व स्टाफ असे खाजगी वाहनाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे ही पेट्रोलींग करीत असताना (पोना ८५५९) रविंद्र लोखंडे (पोना ७६०८) आजीनाथ येडे यांना खबऱ्यामार्फत सदरील गुन्हे अभिलेखावरील सोन्याच्या बांगड्या कटींग करुन चोरणारा गुन्हेगार नामे संतोष जाधव व त्याचा साथीदार यांचेसह मिळून केलेला असून ते दोघेही वाडीया कॉलेजकडुन कोरेगाव पार्क कडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला टू-व्हीलर पार्किंगजवळ उभे असले बाबतची गोपनिय माहिती मिळाल्याने सदर बाबत मा. पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करणेबाबत आदेशीत केल्यानंतर पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाने तात्काळ तिथे दाखल होवुन आरोपी नामे १) संतोष ऊर्फ मॅनेजर शरणमा जाधव (वय ४१ वर्षे) रा. मांजरी बुद्रुक, पवार बिल्डींग, वरद हॉस्पिटल, हडपसर, पुणे व मुळगाव काळंगरी, पो. औद, ता. जि. गुलबर्गा व दुधणी ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक, २) सुधीर ऊर्फ तुझ्या नागनाथ जाधव (वय ४५ वर्षे) रा. शास्त्री नगर साईनाथ मंदीरा शेजारी अवरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे सध्या रा. पुणे फिरीस्ता यांना ताब्यात घेवून जेरबंद केले असुन पोलिसांनी आरोपांकडे अधिक चौकशी केली असता आरोपांनी दाखल यापुर्वीच्या दाखल गुन्हामध्य त्यांचा सहभाग असल्याची कबुली दिली. तसेच आरोपींच्या ताब्यातून कि. रु. १,२०,०२५/- किमतीची सोन्याची पाटली व कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींना पुढील कारवाई करीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे चाव्यात देण्यात आले आहे

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार मा गोलोन सहआयुक्त, पुणे शहर श्री. दीपक मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल शेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे व श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस हवालदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, पोलीस नाईक रविंद्र लोखडे आजिनाथ येडे, गणेश ढगे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, पोलीस अमलदार शिवाजी सातपुते, सुमित ताकपरे महेश पाटील, श्रीकांत दगडे यांनी केली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल