पुणे – फरार सराईत गुंडांच्या पुढच्या शिकारा आधीच…सहकारनगर पोलिसांची कामगिरी….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): भांडणात मध्यस्थी आल्याचा राग धरून २५ ऑक्टोंबर (बुधवार) रोजी ” जास्त शहाणा झालास का याला मारून टाकू याला आता संपवायचाच” असे बोलून बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी इसमावर धारधार हत्याराने वार करून, आरोपींनी हातातील हत्यारे, बांबू हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांसमोर “आम्हीच इथले भाई आहोत कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत माजवली होती, सदर बाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे आरोपी बबलू कोठारी, सल्या शेख, सनी जाधव विरोधात ( गुरनं २७७ / २०२३ ) नोंद करण्यात आल्या नंतर पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी सत्र फिरवतघातक हत्यारासह के के मार्केट येथील पेट्रोल पंपाशेजारी कोणाची तरी वाट पाहत, पुढच्या काहीतरी गुन्हा करण्याच्या इरादयाने थांबलेल्या सराईत फरार आरोपी सलमान उर्फ सल्या शेख (वय २४ वर्षे) रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर ११ माताजी सुपर मार्केट समोर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे , यांस शिफातिने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे कंबरेला एक लोखंडी हत्यार मिळून आल्याने त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७८ / २०२३ प्रमाणे भारतीय हत्यारबंदी कायदा कलम ४ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७७/२०२३ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सनी जाधव यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात जेरबंद करण्यात आले आहे, तसेच दाखल गुन्ह्यातील दुसरा आरोपी नामे वैभव उर्फ बबलू कोठारी यांस २६ ऑक्टोंबर (मंगळवार) रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार सुशांत फरांदे यांच्या गोपनीय बातमीनुसार अरण्येश्वर मंदिरा जवळुन ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे..सदर आरोपी सलमान ऊर्फ सल्ल्या शेख हा आदेश बिरामणे टोळीचा सदस्य असुन त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, मारामारी अशा प्रकारचे एकुण ७ गुन्हे सहकारनगर व भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत तसेच वैभव ऊर्फ बबलू कोठारी त्याच्यावर मारामारीचा १ गुन्हा सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे करीत आहेत.