पुणे – “तेरे वास्ते फोन चोरी कर आऊंगा…”तब्बल २ लाखांची छाप….भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : – आता प्रेमात ‘ तेरे लिये चांद तारे लाऊंगा ‘ बतावणी करणारे प्रेमी युगल काही नवीन नाही पण, फक्त प्रियसीला इंप्रेस करण्यासाठी म्हणून भिवरी मधील २ तरुणांनी आतापर्यंत तब्बल २ लाख पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल फोन चोरले आहे, पुण्यातील कोंढवा, कात्रज, गोकुळनर अशा विविध ठिकाणाहून तब्बल १५ पेक्षा अधिक फोन चोरून आपण कसे रोज नवनवीन महागडे फोन खरेदी करून वापरतो हे दाखवून प्रियसी वर छाप पाडण्यासाठी चोरी करणारे १ ) अर्जुन महादेव शेलार, (वय १८) रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे व २) प्रेम राजु शेलार, (वय २० वर्षे) रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांना भारती विद्यापीठ पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे, मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल चोरी, सोन्याच्या वस्तू हिसकावून नेणे अश्या अनेक तक्रारीत वाढ झाली आहे, वाढत्या तक्रारी पाहता पुणे पोलिसांनी देखील आपले सत्र मजबूत केले, त्यातूनच पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दि.२५ (बुधवार २०२३) रोजी कात्रज तलाव येथे दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करता आले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून, अर्जुन महादेव शेलार, व प्रेम राजु शेलार, यांचे ताब्यातील बॅगेची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये एकुण ०२,०२,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन मिळुन आले. त्यामोबाईल फोनबाबत आरोपीतांकडे तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन है कात्रज, गोकुळनर, कोंढवा भागातून चोरी केले असुन ते विक्री करता आले असल्याचे कबूल केले आहे.

सदर मोबाईल पैकी एक विवो कंपनीचा मोबाईल फोन हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६९७ / २०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपीतांना नमुद्र गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडुन एकुण ०२,०२,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. आरोपीतांचे ताब्यात मिळुन आलेल्या उर्वरीत १४ मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे. आरोपीतांकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्यासाठी चोरी केले असल्याचे सांगितले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेशकुमार, मा. सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे, यांच्या पथकाने केली आहे…

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल