पुणे – “तु आता गेलास, तुला खल्लासच करणार”कात्रज कोंढवा रोडवरील दांडीयाच्या रात्रीत…२ आरोपी जेरबंद…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचे फरार आरोपींचे मुसक्या अवळत जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. कात्रज कोंढवा रोडवरील दांडीयाच्या कार्यक्रमात हे फरार आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी१) विनोद बालाजी सोमवंशी, वय २० वर्षे, रा. घर नंबर ४ शिवशाही चौक, जांभुळवाडी रोड, दत्तनगर, कात्रज, पुणे व २) गोविंद बबन लोखंडे, वय १८ वर्षे ३ महीने, रा. रईस बेकरीजवळ, शनिनगर, जांभुळवाडी रोड, कात्रज, पुणे यांना अटक केली आहे.दाखल गुन्ह्याचा तपशील : दि.०५/१०/२०२३ रोजी श्री गणेश सुपर मार्केट, चालक यास आरोपी भुषण भांडवलकर व जावेद शेख यानी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरुन मारहाण करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी देवून, पैशाची मागणी करुन ( खंडणी) , पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन, भूषण व जावेद हे शिवीगाळ करत असताना फिर्यादी हे मध्यस्थी आल्याने विनोद सोमवंशी, भुषण भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुषार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, सुरज बांदल, प्रविण गुडे, विधीसंघर्षीत बालकांनी घातक हत्यारांनिशी सज्ज होवुन, बेकायदेशीर जमाव जमवुन, फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन फिर्यादी यांचा मुलगा यास विनोद सोमवशीने “तु आता गेलास, तुला खल्लासच करणार” असे म्हणुन त्याचे डोक्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी फिर्यादी, त्यांचा पुतण्या याला व रोहीतचा मेहुणा यास मारहाण करून फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, खाली पार्क केलेल्या गाडयांची तोडफोड करून नुकसान केले होते त्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तदनंतर मुख्य आरोपी विनोद सोमवंशी व गोविंद लोखंडे हे गुन्हा झाल्यापासुन मिळुन येत नव्हते. ते त्यांचे वारंवार अस्तिव लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वावरत होते. त्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांनी तपास पथकाच्या वेगवेगळया टिम तयार करुन सदर आरोपीतांचा शोध घेण्यास सांगितले वरून, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अमलदार हे सदर आरोपीताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे याना नमुद गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी १) विनोद बालाजी सोमवंशी, २) गोविंद बबन लोखंडे, यांना ताब्यात घेवुन दिनांक १८/१०/२०२३ रोजी अटक केली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल