पुणे – घोरपडी पेठ- साहु.. खुनाच्या आरोपींना १२ तासात अटक… ‘हे’ होते खुना मागचे कारण…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुण्यात काल ३० ऑक्टोंबर (सोमवार) रात्री २ च्या सुमारास हल्लेखोरांनी सदनिकेत शिरून अनिल रामदेव साहु यांच्यावर गोळीबार करून डोक्यात गोळी झाडून खून केल्याच्या प्रकरणाने पुण्यात मध्यरात्री पासून एकच खळबळ उडाली होती. सदर बाबत अनिल साहु याचा भाऊ चुरणकुमार साहु याने दिलेल्या तक्रारी वरून खडक पो स्टे गुर नं ३६९ / २०२३ अन्वये गुन्हा दाखल होताच खडक पोलिसांनी तत्परतेने अवघ्या १२ तासात खुनातील ३ आरोपींना जेरबंद केले आहे, श्रीकृष्ण हाईटस पोरपडी पेठ पुणे येथे इसम नामे अनिल रामदेव साहु वय ३५ वर्ष रा. सदर यास दोन अनोळखी इसमांनी बंदुकीतून गोळ्या घालुन जीवे ठार करून फरार झालेले आरोपी १) रोहित संपत कोमकर (वय ३३ वर्ष) रा. ७१५. गुरूवार पेठ, पुणे यास पी.एम.टी. डेपो समोरील फुटपाथ, स्वारगेट येथून व आरोपीत नामे २) गणेश उल्हासराव शिंदे, (वय ४१ वर्ष,) रा. चव्हाणनगर, झांबरे हेरिटेज समोर धनकवडी, पुणे. यास झांबरे पॅराडाईज समोर सार्वजनीक रोड, चव्हाणनगर धनकवडी, पुणे येथून ताब्यात घेतले तसेच ३) अमन दिपक परदेशी (वय २९ वर्ष) रा ४१, घोरपडे पेठ, पुणे हा त्याचे रहाते घरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,असे केले १२ तासात अटक : दाखल गुन्हयांची माहिती मिळताच युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे घटनास्थळी भेट देवुन सीसीटीव्ही फुटेज बघत असताना असताना आरोपीची बाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की, दिनांक २९/१०/२०२३ रोजी इसम नामे रोहीत कोमकर रा श्रीकृष्ण हाईट्स घोरपडे पेठ, पुणे याचा वाढदिवस असल्याने त्याचे घराचे खाली वाढदिवस साजरा करण्याकरीता भरपुर मुले आली होती व ती त्याचे बिल्डींगचे पार्किंगमध्ये दारू पिवून धिंगाना करीत होती. त्यावेळी यातील मयत इसम नागे अनिल साहु याची रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ लोधा व त्याचे मित्र रोहीत कोमकर व गणेश शिंदे यांचेशी कोणत्यातरी कारणावरून भांडणे झाल्याने त्या सर्वांनी मिळून संदर्भीय गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सदर परिसरातील आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नमुद इसम हा नवनाथ लोधा असल्याचे समजले.आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अमलदार थोरात यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, संदर्भीय गुन्ह्यातील आरोपीत नामे रोहित कोमकर हा स्वारगेट पी.एम.टी. डेपो समोर उभा आहे व पोलीस अमलदार अय्याज दड्डीकर याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की यातील पाहीजे आरोपीत गणेश शिंदे हा त्याचे रहाते घरी चव्हाणनगर झांबरे हेरिटेज समोर धनकवडी, पुणे येथे आहे असे समजताच अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून टिमसह आरोपीत नामे १) रोहित संपत कोमकर २) गणेश उल्हासराव शिंदे,३) अमन दिपक परदेशी यांना ताब्यात घेऊन सदर आरोपीकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे.खुनाचे नेमके कारण : आरोपी रोहित कोमकर व गणेश शिंदे यांचेकडे केले तपासामध्ये दाखल गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपी नवनाथ लोधा याने दोन दिवसापुर्वी मयत इसम अनिल साहु यास ५०००/- रु मागितले होते परंतु त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन आज दिनांक ३०/१०/२०२३ रोजी रात्री ०२.०० वा सुमारास मयत इसम बिल्डींग खाली बसले असताना सदर ठिकाणी मुख्य आरोपी नवनाथ लोधा हा मयत इसमाजवळ जावुन त्यास शिवीगाळ करुन झटापट केली त्यावेळी गयल इसमाने त्यास विरोध केल्याने त्याचा राग येवुन मुख्य आरोपीने मयत इसमाचे कपाळावर बंदुकीने गोळी झाडुन जिवे ठार केले मारल्याचे निष्पन्न झाले आहे.