पुणे – कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितेस ….ॲड. निसार पठाण आणि ॲड शिरीन तांबोळी कडून अविश्वसनीय न्याय…!
खादी एक्सप्रेस (ऑनलाईन) : न्यायचा भरमसाट अभ्यास आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची जिद्द याच दोन पैलूंवर ठामपणे प्रयत्नशील राहणारे ॲडव्होकेट निसार पठाण यांनी पुन्हा एकदा न्याय मिळवून देण्याच्या आपल्या शिखरात भर टाकत एका कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितेला कौतुकास्पद न्याय मिळवून देऊन आपल्या व्यवसायाची, कामाची व्याख्या खरी करून दाखवली. कौटुंबिक हिंसाचाराच्या जाळ्यात आणि समाज काय म्हणेल म्हणून निमूटपणे अन्याय सहन करणाऱ्या त्या महिलेने जेव्हा आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध ॲड. निसार पठाण यांना कल्पना दिली त्यातच नाण्याच्या दोन्ही बाजूंची शहनिषा करून पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या जिद्दीने, कोर्टातील वाद, युक्तिवाद, आरोप प्रत्यारोप, खरे खोटे, या अनेक बाबिस खंबीर पणे तोंड देत अखेर या पीडित महिलेस ॲड. पठाण यांनी दरमहा पोटगी रू. ९०,०००/- मिळवून दिली, आणि जेव्हा सदर कोर्टाच्या निर्णयाचा आनादर पीडितेच्या पतिने केला तर ॲड. निसार पठाण आणि त्यांचे सह ॲड. शिरीन तांबोळी यांनी कोर्टातून पोलीस विभागास पाठोपाठ बँगलोर आयुक्तांकडेच अटक वॉरंट (arrest warrant) ऑर्डर जारी केले मूळातच अखेर पर्यंत न्यायाची आणि सत्याच्या बाजूने दटून राहण्याच्या जिद्दीनेच सदरील दाव्यातील पीडितेला कौतुकास्पद न्याय मिळवून दिला आहे ज्यामुळे कौटुंबिक हिंसाचारास बळी पडणाऱ्या महिलांचा न्यायावरचा विश्वास अधिक भक्कम झाला आहे. सुरवातीपासूनच सत्याची बाजू भक्कम धरून अन्याय विरुद्ध लढण्याच्या जिद्दिवर ॲड. पठाण यांनी आपल्या उच्च शिक्षण (B. Com, L. L.B, L. L. M, D. L. L), कायदेशीर ज्ञानाचा योग्य वापर करून अनेकांना अनपेक्षित न्याय मिळवून दिला त्यात अटकपूर्व जामीन असो, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नरधामास कोठडी पर्यंत पोहचवणे होय अथवा खोट्या आरोपात अडकलेला पीडित व्यक्तीसाठी विरुद्ध पार्टी समोर प्रश्न उपस्थित करून दिल्ली न्यायालयासमोर त्यांनी आपल्या ज्ञानातून उत्कृष्ट बाजू मांडून सत्याला न्याय मिळवून दिला आहे. सोबतच सामाजिक कार्यासाठी प्राधान्य देणाऱ्या ॲड. निसार पठाण यांना पुढील वाटचलीसाठी ‘ खादी एक्सप्रेस ‘ तर्फे भरभरून शुभेच्छा..