पुणे – कोंढवा खुर्द मधील दुर्देवी घटना….! प्रशासनाच्या निष्काळजीपणाने घेतला ४ वर्षीय शेहजाद चा जीव…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): प्रशासनाचा हलगर्जी, आणि निष्काळजी पणामुळे कोंढवा येथील ४ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोंढवा मधील प्रभाग क्र. २७ , गल्ली नं. १० कुबा मस्जिद जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उघड्यावर पडलेल्या खुल्या तोंडाच्या वीज वहिनी तारेचा झटका लागून ४ वर्षीय शेहजाद अमीर सय्यद अल्पवयीन मुलाचा (२ मार्च , दुपारी २:०० च्या सुमारास ) जागीच मृत्यू झाला असून या घटने मुळे परिसरात शोकाकुल निर्माण झाले आहे आणि तेवढाच रागही नागरिकांना कडून प्रशासन साठी व्यक्त केला जात आहे.

live Video Cam Recording

मिठानगर परिसरात रस्त्याच्या दुरुस्ती साठी म्हणून करण्यात आलेल्या या खोदाई कामात फक्त आणि फक्त रस्त्यात खड्डे करून ठेवले आहेत आणि मुख्य कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे खोदकाम अश्या प्रकारे करण्यात आले आहे की तेथील रहिवासी यांना जण्या जेण्या साठी २ फुटाचा रस्ता देखील सोडण्यात आलेल्या नाही नाईलाजास्तव त्या खड्या वरून उडी मारून घरी जाण्याच्या प्रयत्नात या चिमुरड्याला उघड्या पडलेल्या वायरीचा शॉक लागून ही दुःखद घटना घडली. कोंढवा मधील हा भाग अतिशय गजबजलेला परिसर आहे आणि या खड्या मुळे येण्या जाण्याचा रस्ताच शिल्लक राहिला नाही, रस्त्याच्या खोदाईत जो पर्यंत एक लाईन पूर्ण होत नाही तो पर्यंत पुढील लाईनीचे खोदकाम सुरू करता येत नाही तर हे खोदकाम करणारे कश्या वरून ठेकेदार, रस्त्याचे काम करणारेच लोक आहेत कारण त्यांना साधे सरळ नियमच माहीत नाही अर्धवट रस्त्याच्या कामामुळे तेथील रहिवासी लोकांना आपले वाहन बाहेर रस्त्यावर लावावे लागते ज्या मुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

या घटने नंतर नागरिकांनी एम.एस.सी.बी चे अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की “सदर खोदकाम विषयी ठेकेदार, मनपा यांच्या कडून आम्हाला कोणतेही पत्र मिळाले नाही” तर मग याचा जबाबदार कोणाला म्हणू शकतो, जर एम.एस.सी.बी कडून परवानगी नाही मिळाली तर एम.एस.सी.बी कडून गुन्हा दाखल झाला पाहिजे की वीणा परवाना खोदाई काम करून सदर वायरी कशा खुल्या सोडू शकता आणि जर सदर कामास परवानगी असेल तर या दुर्देवी घटनेची जबाबदार एम.एस.सी.बी ला धरण्यात येईल का…जमिनी खालून जाणारी वीज पुरवठ्याच्या खुल्या तोंडाच्या वायरी रस्त्यावर आणि खडयात पडलेले आहे ज्या वायरींचा विद्युत पुरवठा बंद करण्याची जबाबदारी ही एम.एम.सी.बी, आणि रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार याची होती पण प्रशासनाचे अधिकारी म्हणवून घेणारे लोक तिजोरी भरण्यात एवढे मग्न आहेत की त्यांना आपल्या कामाची जाणीव राहिलेली नाही त्यांच्या या निष्काळजी पानाचा जबाबदार कोण..?

असलम इसाक बागवान

इनक्रेडेबल ग्रुप च्या समाजसेवक यांनी जेव्हा चौकशी केली तर त्यांना असे सांगण्यात आले की “आमदार यांच्या निधीतून कामाला सुरवात झाली” तर आमदार या घटनेला जबाबदार का…? जेव्हाही अश्या कामाचं टेंडर ठेकेदाराला मिळते तर सर्वात आधी त्याला एम.एस.सी.बी कडून परमिशन घेऊन आणि त्या काम बद्दल परवानगी, आणि एम.एस.सी.बी चे लेटर मिळतो तेव्हाच कामाला सर्वात होते मग या ठेकेदाराकडे तसा लेटर किंवा परवानगीचा कोणता पुरावा होता का कारण खोदाई काम सुरू करताच त्या ठिकाणी ज्या टेकेदारां तर्फे हे काम सुरू करण्यात आले आहे त्याचा नाव, संपर्का साठी चा क्रमांकाचा फलक सदर ठिकाणी लावला जातो पण या प्रकरणात असे कोणतेही फलक सदर ठिकाणी लावलेले नाही, आणि जर एम.एस.सी.बी कडून परवानगी आहे तर त्यांचे कर्तव्य आहे की कामावर लक्ष ठेवले जावे की ज्या भागात काम आहे तेथील वीज प्रवाहाची वायरी उघड्यावर आहेत का जर तसे काही असेल तर तेथील विद्युत पुरवठा बंद करावा.. मागील १ महिना पासून कासवाच्या गतीने फक्त मतदान काळात आम्ही नागरिकांच्या सेवा आणि सोई साठी रस्त्याचे काम करत आहोत हे दाखविण्यासाठी की काय पण प्रशासन, एम.एस.सी.बी, विभागातील नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर या पैकी या दुर्देवी घटनेचा साठी कोण कोण कारणीभूत आहे..? इनक्रेडेबल ग्रुपचे अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी सदर घटने बाबत दुःख व्यक्त केले सोबतच ते म्हणाले की या घटनेत अजून पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल का दाखल केला नाही.. त्यांच्या वर कोणत्या प्रकारचा दबाव टाकण्यात आला आहे का..? ज्या मुळे आत्ता पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही मत मागण्यासाठी बॅनर लावणारे कार्यक्षम लोक गप्प का …? भाग्योदय नगर, शिवनेरी नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील ५ महिन्या पासून सुरू आहे हा प्रशासनाचा नागरिकांसाठी ची काळजी का…?
नागरिकांचे प्रश्न :-

  • या खोदाई कामात निधी कोणाची..?
  • काम करणारा ठेकेदार कोण..?
  • नियम नुसार जे.सी.पी कोणाचा..?
  • मुलाचे मृत्यचा भांडवल करण्यापेक्षा त्याला व त्याच्या कुटुंबीयांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करा.
  • प्रश्नांना उत्तर मिळेल की नाही ते तर नाही सांगू शकत पण या सगळ्यात एका निष्पाप जीव बळी गेला ही सर्वांसाठीच एक लज्जा स्पद गोष्ट आहे

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल