पुणे कॅम्प रेड हाऊस फाऊंडेशनचे ‘आका’ शंतनु कुकडे बलात्काराच्या गुन्हयात अटक…..! भाग १

खादी एक्सप्रेस ( ऑनलाईन ) : पुणे कॅम्प नाना पेठ परिसरात मागिल अनेक दिवसा पासुन रेड हाऊस फाऊंडेशन’ नावा खाली वेश्या व्यवसाय, डांस बार, सोबतच परदेशातुन येणारा कोटयावधी पैश्यांची उलाढाल, धर्मपरिवर्तनासाठी येणारी देणगी अश्या अनेक काळया धंदयांचा खेळ अखेर उघडकिस आला आहे, रेड हाऊस फाऊंडेशन चालविणारे माजी राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्ष अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदाधिकारी शंतनू कुकडे विरोधात पुणे ‘समर्थ पोलिस स्टेशन’ येथे एका मुलीने बलात्कार व लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे ज्या बातमीने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
फाऊंडेशनच्या नावाखाली गोरगरीब गरजु मुलींना फाऊंडेशनतर्फे काम मिळवुन देण्याचे अमिश दाखवुन वेश्या व्यवसाय व डांस बार मध्ये ढकलणे त्यांचा लैगिंक छळ करणे तसेच लोेकांची मत परिवर्तन करून जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडणे, हाय प्रोफाईल लोकांना मुली पुरविणे, पैष्यांच्या जोरावर राजकिय पद मिळवुन परिसरात दहशत निर्माण करणे असे अनेक बेकायदेशीर आणि समाजाला काळीमा फासण्याचे काम पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरी सुरू होते.
नाना पेठ येथे रेड हाऊस च्या बंगल्यात तसेच आषिश कॉर्नर पदमजी पार्क इ. ठिकाणी डांस बार चालवुन पुण्याच्या संस्कृतीला धुळीस मिळवुन रात्री बे रात्री मोठ मोठ्या आवाजात सुरू असनारा धांगडधिंग्या विरोधात सदरील परिसरातील नागरीकांच्या वेळोवेळी तक्रारी येत होत्या त्यातच शंतनु कुकडे कडुन काम मिळवुन देण्याचे अमिश दाखवुन वेष्याव्यवसाय करण्यास भाग पाडत लैगिंक छळ केल्याप्रकरणी एका मुलीने पुढे येवुन न्यायासाठी पोलिसात धाव घेतली ज्यानंतर समर्थ पोलिसांनी धडक कारवाई करत शंतनु कुकडे वर भा.द.वि कलम 64(2) जे.एम, 75 (2), 351 (2) तसेच पोस्को कलम 8, 12, आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असुन सध्या शंतनु कुकडे पोलिस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास सुरू असल्याची माहिती मा. डी.सी.पी संदीप सिंग गिल यांनी माध्यमांना दिली.

शंतनु कुकडे चालवित असलेला ‘रेड हाऊस फाऊंडेशन’ च्या जाहिरातीचे झेंडे कॅम्प मध्ये जागोजागी दिसत होते तर सदर फाऊंडेशन धर्मादायांकडुन रजिस्टर होते का ‽

सदर फाऊंडेशनच्या नावाखाली आणखी कोण कोण सदर गैरकायदेशीर कामात सहभागी होते?

परदेषातुन येनारा पैसे सदर फाऊंडेषनच्या बॅंक खात्यात येत होते की अन्य कोणा व्यक्तिच्या खात्यातुन सदर काळया पैष्यांना पांढरा रंग देण्याचे काम सुरू होते?

तसेच शंतनु कुकडे सोबत आणखी दुसरया राजकिय पार्टी च्या लोकाचा समावेश देखील या सर्व कारभारात असल्याची शंका वर्तविली जात आहे या सर्व प्रष्नांची उत्तरे ‘खादी एक्सप्रेस’ समोर आणणार आहे.


खोटया बतावणीतुन राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्ष अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्ष पद मिळविनारा शंतनू कुकडे करत असलेल्या गैरकृत्याची काहीशी शंका येताच गुन्हा दाखल होण्याच्या अवघ्या 8-10 दिवसापुर्वीच आमदार इद्रिस नायकवडी राज्य प्रमुख अल्पसंख्यांक विभाग यांनी शंतनू कुकडे यांस पक्षातुन बेदखल केले याबाबत माहिती मिलताच खादी एक्सप्रेस प्रतिनिधीने आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासोबत संपर्क केला असता ‘वारंवार समज देवुन सुध्दा पक्ष शिस्तिचा उलंघन करत असल्या कारणाने शंतनू कुकडेला पक्षातुन निलंबित केले बाबतची माहिती देण्यात आली.

याबाबत माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या ‘एक्स डाॅट काॅम’ च्या ऑफिशिअल पेजवर सदर घटणेचे विशयी माहिती देत ‘यापुर्वी या व्यक्तिबाबत अनेक तक्रारी येत होत्या परंतु पुराव्यांच्या जुळवा जुळव करत अनेक उलगडे होत गेले ज्यात बलात्कार, बळजबरी धर्मांतर घडवुन आणणे, हाय प्रोफाईल व्यक्तिंना मुली पुरविणे, परदेषातुन येणारा कोटयावधी पैसा, देशाबाहेरील ट्रस्ट कडुन येणारा धर्मातरासाठी मिळणारी देणगी असे अनेक उलगडे झाल्याने सदर नराधमाची बॅंक खात्याची चौकशी, पदावरून हकालपटटी आणि कठोरात कठोर कारवाईची’ मागणी त्यांनी आपल्या पोस्ट मधुन केली आहे.

स्थानिक लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे व पोलिसांकडे ‘रात्री दोन तीन वाजेपर्यंत स्पीकर लावलेले असतात त्याचा त्रास होतो म्हणून तक्रार करताच शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, विभाग प्रमुख राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे, अजय परदेशी, युवराज पारिख, राहुल आलमखाने, रमेश परदेशी, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, गौरी चव्हाण, निकिता मारटकर, पद्मा सोरटे, स्वाती कथलकर, स्मिता पवार यांनी समर्थ पोलिस स्टेशन येथे व नाना पेठेत ज्या ठिकाणी डांसबार चालू होता जिथे मुलीवर अत्याचार झाला त्या ठिकाणी धडक दिली तसेच पीडित मुलीला संरक्षण देण्यात यावे, तिच्यावर दबाव टाकणार्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असुन या शंतनु कुकडेला परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रक्कम येते. गोरगरीब जनतेला आमिष दाखवून त्यांचे मत परिवर्तन करत असतो त्यामुळे कोणत्याही दबावाखाली न येता शंतनू कुकडे व त्याच्या साथीदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली
या घटणेने तर फक्त काहीसा खुलासा जनते समोर आला आहे पण आणखी खोलवरचे गुढ उलगडणे बाकी आहे जे लवकरच ‘खादी एक्सप्रेस’ आपल्या पुढील भागात करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *