पुणे – कार्यक्रम पार… हत्यारांचा वार…पर्वती भागातील प्रकार ३ आरोपी अटक….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुण्यात ह्या ना त्या कारणावरून कोयते, हत्यारांचा वार ही जणू सवयच जडल्याचे प्रकार पाहता पुण्यात प्रत्येक सामान्य नागरिक एका दहशती खालीच जगत आहे, पुणे पोलिसांच्या गुन्हेगारी नष्ट करण्याच्या अफाट प्रयत्नाच्या एक पायरी पुढे गुन्हेगारी असल्याचे चित्र दिसू लागले आहे, त्यात भर देत, जनता वसाहत, पुणे येथे सोमवार (दि.२३ ऑक्टो.) रोजी वाघजाई मित्र मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडताच कार्यक्रम संपल्यानंतर त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हत्यारे, धारधार शास्त्रासह येऊन तेथे उपस्थित नागरीकांना शिवीगाळ करून मंडळातील सर्वांना मारून टाकणार आहे अशी धमकी देत, दहशत माजवत, ऋषिकेश ऊर्फ चेतन पवार, (वय २३ वर्षे,) रा. गल्ली नं. ५९ जनता वसाहत. पुणे या तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी करून पळ काढत असताना त्याच परिसरात राहणाऱ्या महिलेच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून जखमी करून परिसरात दहशत निर्माण केली.प्रकरणाची दाखल घेत पर्वती पोलिसांनी १) मिलींद सुधीर कवडे, (वय १९ वर्षे), रा. गल्ली नं.३८. जनता वसाहत, पुणे २) शुभम नारायण मोरे, (वय- १९ वर्षे,), ३) संकेत श्रीकांत घाणेकर, (वय १९ वर्षे) रा. गल्ली नं.३९, जनता वसाहत, पुणे या आरोपींना अटक केली असून आणखी २ आरोपी विरोधात पो.स्टे. गुरनं / कलम पर्वती पो. स्टे ३२६ / २०२३ भादविक कलमांतर्गर गुन्हा दाखल केला आहे.