पुणे – इंस्टाग्राम पोस्टवरच्या कॉमेंटचा राग धरून कोथरूड मधील मुलावर खुनी हल्ला….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) -: फेसबुक, इंस्टाग्राम थोडक्यात सोशल मीडियावर पोस्ट, लाइक्स, कॉमेंट हे तर लहान मोठ्या सर्वांचाच दिनचऱयेचा एक अविभाज्य भागच बनला आहे असे म्हणू शकतो पण याच सोशल मीडियातील पोस्ट वर कॉमेंट करणे कोथरूड येथील १९ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले आहे.फक्त इंस्टाग्राम वरील पोस्टवर केलेल्या कॉमेंटचा राग मनात धरून कोथरूड येथील रामबाग कॉलनी, हायस्कोर कॅफे मध्ये सकाळी ११ च्या सुमारास, रितेश काळे व त्याचे ५-६ साथीदारांनी, हाय स्कोर कॅफे मध्ये बसलेल्या विकी (वय १९) यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून, विकी वर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटने बद्दलची फिर्याद सौरव गुलाबराव भोसले ( वय ४६, रा. वारजे माळवाडी ) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये केली फिर्यादी ने दिलेल्या तक्रारी नुसार, कोथरूड पोलिसांनी रितेश काळे व त्याचे ५-६ साथीदारांना विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरिक्षक बडे पुढील तपास करीत आहेत.