पुणे – अमली पदार्थ तस्कऱ्याच्या शक्कलीला पुणे पोलिसांची तोड…! महाराष्ट्र शासनाच्या पाटीचा वापर करून सुरू होती तस्करी…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुणे हे अंमली पदार्थ तस्कारांचे हब होत चालल्याचे चित्र पहायला मिळत आहे, या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी हे लोक काय शक्कल लावतील याला नेम नाही, आंध्र प्रदेशातून पुण्यात मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून, १) संदिप बालाजी सोनटक्के, वय २९ वर्षे, रा. मु.पो. दहिवली, अरिहंत आर्शीया बिल्डींग, पाली फाटा, खोपोली ता. खालापुर, जिल्हा रायगड २) महिला नामे निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी, वय ३६ वर्षे, रा चिलाकरलुपेठ, जिल्हा गंटुर राज्य आंध्रप्रदेश, हे त्यांच्या कडील स्कॉर्पिओ गाडीवर लोकसेवा नसतानाही महाराष्ट्र शासनाच्या नावाचा बोर्ड लावून तसेच ३) महेश तुळशीराम परीट वय २९ वर्षे, रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापुर, जिल्हा रायगड हा त्याच्या कर मधून विक्रीसाठी आणलेला १,१९,८२,२०० /- रु किं. चा एकुण ५२० किलो गांजा व इतर ऐवज आरोपीकडुन जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुनिल थोपटे पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके व पोलीस अंमलदार हे सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे गाड्याची चेकींग केली असता त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे एक पांढ-या रंगाची एक कार व स्कॉर्पिओ ह्या संशयित वाहनामध्ये कार मधुन वरील आरोपींनी मिळुन एकुण १,१९,८२,२०० /- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये १,०४,१५,०००/- रु. कि.चा ५२० किलो ५५० ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ, ९,००,०००/- रु. किं.ची स्कॉर्पिओ गाडी ६,००,०००/- किं.ची कार ७१,०००/- रु किं चे चार मोबाईल फोन व २००/- रू. किं.चा बोर्ड असा ऐवज व अमली पदार्थ संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस अमलदार योगेश मांढरे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (क) २०(ब) (ii)(क). २९ व भादंवि कलम १७०३४. अन्वये गुन्हा दाखल केला आहे…दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके, अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर या करत आहेत.