पुणेकरांनो जागे व्हा…! मूर्ख बनवण्यासाठी उद्या मेट्रोचे उद्घाटन- प्रशांत जगताप

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन)-:- राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काल (०५ मार्च) दुपारच्या सुमारास फेस बुक, व्हिडिओ द्वारे पुणेकरांना आज देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी सकाळी ११:३० च्या सुमारास पुण्यात येत असलेल्या मेट्रोच्या उद्घाटनासाठीचे अर्धवट प्रकल्पाची सद्यस्थिती चे प्रतिबिंब पुणेकरांना दाखवले, “पुणेकरांनो जागे व्हा, आपल्याला भा.ज.पा आपल्याला मूर्ख बनवत आहे, आपल्या डोळ्यात धूळ फेकत आहेत अश्या शब्दात त्यांनी पुणेकरांना व्हिडिओ द्वारे आपले मत सांगितले सोबतच व्हिडिओ मध्ये प्रशांत जगताप यांनी एस.एन.डी.टी चौकात सुरू असलेल्या अर्धवट मेट्रोच्या कामाची स्थिती पुणेकरांना दाखवली.

प्रशांत जगताप फेसबुक लाईव्ह

मुळात मेट्रोचे काम अजून अर्धवट स्थितीत आहे ज्याला पूर्ण होण्यास कमीत कामी ५ वर्षाचा कालावधी लागेल, राणीच्या बागेतील फुलराणी अगिनगाडी चा प्रवासा इतकाच काम पूर्ण झालेला असून त्या अर्धवट कामाच्या उद्घाटना येवून फक्त आणि फक्त भा.ज.पा साठी मत जमा करण्याचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे, पुणेकर निद्रेत आहेत अश्या गोड गैरसमजात शहर भा.ज.प, पुणे महानगर पालिकेची एकूण सर्व सत्ताधारी मंडळी असून ते पुणेकरांची फसवणुक करत आहेत अशी टीका देखील जगताप यांनी केली. ५वर्षात भा.ज.पा कडून पुणेकरांसाठी काहीच करता आले नाही, मुळात पुणे मेट्रोमध्ये भा.ज.पा चे कोणतेही प्रकारचा हातभार नाही, मुळात २००८ साली पुणे मेट्रोचा प्रवास सुरू झाला ज्या वेळेस शहरात पुणे महानगर पालिकेत तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती याच साली राज्या मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आणि केंद्रा मध्ये राष्ट्रवादी पार्टीची यु.पी.ए गव्हरमेंट होते त्या काळी मेट्रोचा ठराव पुढे गेला २०१६ साली राष्ट्रवादी पार्टी च्या सत्तेत नरेन्द्र मोदीजी यांच्या उपस्थितीत मेट्रो प्रकल्पासाठीचा नारळ फुटला एकंदर सुरवात झाली त्या नंतरच्या ५वर्षाच्या कालावधी मधील मेट्रोच्या कामात भा. ज.पा चा कोणताही हस्तक्षेप नसून २०% वाटा हा सेंट्रल गव्हरमेंट, १०% वाटा हा पुणे पिंपरी म.न.पा, तर २०% वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे आणि बाकी ५०% वाटा हा आपल्या तिकीटा मधुन कापला म्हणजेच उभारलेल्या कर्जाचे हप्ते आपल्या तिकीटाच्या पैस्यांमधुन कापले जाणार तर भा. ज.पा. चा यात सहभाग नसून देखील या उद्घाटनाने भा.ज.पा मेट्रोच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच त्यांनी पुढे सांगितले की उद्घाटन झाले म्हणजे मेट्रो सुरू झाली.. त्याचा उपयोग आपण पूर्णपने करू शकतो असे नाही मुळात मेट्रोचा पुण्यामध्ये ५४ कि.मी रुट आहे ज्यातील ३१ कि.मी चा पहिला टप्पा आहे ज्या मधील फक्त ५ की. मी ( गरवारे कॉलेज ते कोथरुड वणास या ठिकाण ) चा लोकार्पण सोहळयातून मेट्रो सुरू झाली असे भासवून मोदीजी आणि भा.ज.पा चे पक्ष नेते पुणेकरांची फसवणूक करत आहे असे व्यक्तव्य करत जगताप यांनी मेट्रोचे अर्धवट काम देखील पुणेकरांना व्हिडिओ द्वारे दाखविला ज्यात मेट्रोसाठी वर जाण्याच्या मार्गावर स्टेअर केस वर पत्रे लावण्यात आले नाही, प्लंबिल, कलर, पत्रे लावणे, मार्गात ब्लॉक आणि अडगळ असल्या मुळे जाण्या-येण्या चा कोणताही मार्ग नाही, प्रवाश्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे अर्धवट काम, अजून प्लाय लावण्याचे काम सुरू आहे, नरेन्द्र मोदीजी मेट्रो मध्ये प्रवासा साठी बसले तर त्यांना साईडची भिंत, म्हणजेच रेलिंग चे काम आजुन झालेले नाही ते लपविण्या साठी त्या ठिकाणी प्लाय चे तुकडे लावण्यात येत आहे, असे बरेच अर्धवट कामाचे चित्र जगताप यांनी पुणेकरांना दाखवले, पुणेकरांचे डोळे उघडावे हीच माझी इच्छा आहे असे वक्तव्य जगताप यांनी केले.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल