( पार्ट -२ ) “त्या” अमानुष मारहाणीने बिघडवले चिमुरड्याच्या मानसिक संतुलन…!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन : काल व्हायरल झालेला व्हिडिओ ज्यात एका तरुणाने अतिशय अमानुष पने छोट्याश्या मुलाला लाकडी बांबू आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, व्हिडिओ ची शहनिषा केली असता तालुका धनरुआ, विर महादेव, बिहार शहरात असलेल्या जया कोचिंग क्लासेस मधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले, या क्लासचा संचालक असलेला विकास कुमार या निर्दयी तरुणाने अवघ्या ६ वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केली, कारण काय..? तर या चिमुरड्याने त्या संचालकाला एक मुली सोबत गैरवर्तन करताना पाहिले…आणि याचा राग धरून संचालक विकास ने कोणतेही भान न ठेवता त्या छोट्या मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्या मारहाणीत त्या चिमुरड्याचा मानसिक संतुलन बिघडले असून त्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. व्हिडिओ व्हायरल होतच ग्रामस्थांनी संचालकाला चोप देत, संबंधित कोचिंग क्लासची तोडफोड केली. आरोपी संचालक किशोर कुमार सध्या फरार आहे.