पंतप्रधान मोदीजी कडून कालच झाले होते उद्घाटन..आणि स्मारकाचा काही भाग आज कोसळला देखील….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) – काल (६मार्च) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या पुण्यातील मेट्रो उद्घाटनासाठी आले होते कार्यक्रमाची सुरवात पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याने झाली (हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे) परंतु आज या ठिकाणी दुर्देवी घटना घडली कालच झालेल्या उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या चाबुतऱ्याचा (स्मारक वरील भाग ) वरचा भाग कोसळून पडला, या प्रकारचे स्पष्टीकरण देत पुणे प्रशासनाने उत्तर दिले, सजावटी साठीच्या साखळ्या काढत असताना स्मारकाचा वरचा भाग तुटून खाली कोसळला, अति घाईगडबडीत उद्घाटन करण्याच्या प्रयत्नात योग्यती काळजी आणि वेळ न मिळाल्या मुळे ही दुर्देवी घटना घडली आहे, सदर स्मारकाचे काम पूर्ण झाल्या खेरीज त्याला पक्के होण्याकरीता ( curing period) चा कालावधी हा कमीत कामी २१ दिवसांचा असतो परंतु उद्घाटनाच्या गडबडीत तो कालावधी ७ दिवसांवर आला ज्या मुळे हा प्रकार आज घडला. प्रत्येकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आदर, प्रेम आहे तरी या घटनेचा कोणत्याही चुकीचा विचार करू नका, किंवा राजनीतिक विषय बनवू आणि काही चुकीची घटना यातून घडू नये याची काळजी घ्या अशी विनंती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली सोबतच पुणे महानगर पालिकेच्या सत्ताधारी भा.ज.पा मंडळी यांना निवडणुकीच्या गडबडीत, अठ्ठहास म्हणून सदर कामकाजाला योग्य तो कालावधी (curing period) मिळू दिला नाही, त्याच मुळे सजावटीच्या गडबडीत स्मारकाचा काही भाग तुटून कोसळला परिणामतः सत्ताधारी भा.ज.प चा प्रशांत जगताप यांनी निषेध नोंदविला, तरी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा किव्वा स्मारकाचा निवडणुकी साठी कोणत्याही राजकीय पक्ष, किंवा इतर कोणीही उपयोग करू नये असे भाष्य जगताप यांनी केले.