पुणे – नागरिकांच्या फाटलेल्या खिश्याला गॅस एजन्सीची कात्री….! व्हिडिओ पहा..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) :- इंग्रज काळातील खाण्या-पिण्याच्या टॅक्सच्या पुनरावृत्ती ने सामान्य नागरिक हैराण असतानाच यात आणखी भर म्हणून नेहरू नगर परिसरातील गॅस एजन्सीचा काळा काळभार समोर आला आहे. ४५०/- रू.च्या पायरीवरून १२००/- च्या पायरीवर झेप घेणाऱ्या गॅसच्या किमतीने गोरगरिबांच्या खिशातला चांगलाच भगडाड बसलाय त्यात गॅस एजन्सीचे कर्मचारी ( टेंपो नंबर MH- 12, QE 3238) एक निर्जन ठिकाणी थांबून स्वयंपाकाच्या भरलेल्या गॅसच्या टाकीमधून पाईपच्या साहाय्याने गॅस रिकाम्या गॅसच्या टाकीत भरून सर्रास पणे गॅस चोरी करतायेत याचा व्हिडिओ नुकताच समोर आल्याने सामान्य नागरिकांनी जगावे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय.
सामान्य नागरिक जिथे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, पेट्रोल – डिझेल चे भाव, टॅक्स, शैक्षणिक वाढती फी च्या जाळ्यात अडकून राहिलाय त्यात अश्या काळ्या कारभार करणाऱ्याच्या कर्तुत्वाने सामान्य नागरिकाच्या फाटलेल्या खिश्याला कात्रीने कापून तुकडे – तुकडे केले जातेय.