नाईट लाईफसाठी मोठ्या गुन्ह्याची वाट…? विमाननगर परिसरात अखेर का थंडावली कारवाई…?
खादी एक्सप्रेस (ऑनलाइन) प्रतिनिधी ( अफझल खान ) : पुण्यातील विमान नगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून वेगळ्याच रंगात आलेल्या नाईट लाईफची चाहूल काय मोठ्या गुन्ह्या घडण्याची वाट तर पाहत नसावी…? कारण या परिसरातील काही दिवसा पासून झालेल्या कायापलट पाहून हाच प्रश्न निर्माण होतो…रात्री 3:00 मध्यरात्रीची वेळ आणि विमाननगर मधील सुरू मद्यविक्रीची दुकाने, चहाच्या टपऱ्या, पाण टपऱ्या, हॉटेल ज्या मुळे येथे जमणारी तरुणाई…दारू सिगरेटचा वापर करत बसणारी तरुण मुले-मुली, रात्रभर अवैध पणे मद्य स्पा चा व्यवसाय अनधिकृत टपऱ्या व हातगाड्या वर विक्री, तसेच झोपडपट्टी भागात अवैध मटका, जुगार अड्डे या भयावह चित्र थांबण्यासाठी कोणता मोठा गुन्हा घडण्याचीतर वाट पाहत नसावी…राज्य सरकारने हॉटेल, बार, दुकाने व आस्थापनांच्या वेळा निश्चित केल्या असून तसे परिपत्रक जारी करूनही विमाननगर परिसरात या कायद्याचा…नियमांचा किती दबदबा आणि पालन होत आहे ते येथे सुरू असलेल्या नाईट लाईफ मध्ये दिसून येतेय..सरकारच्या परिपत्रका नुसार विभागीय स्तरावरही मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, मात्र तरीही रात्री 03:00 वाजल्यानंतर जोमात सुरू असणाऱ्या हॉटेल, टपऱ्या संदर्भात येथील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी वारंवार तक्रारी देऊन या अवैध कामावर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहे…
त्या तक्रारीवरून धूळ जमा होऊ लागलीय पण कारवाईचा काही पत्ता नाही…या नाईट लाईफ मुळे तरुणाई नशेत रस्त्यावर फिरत असतात त्यातून महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय अश्या नाईट लाईफ मधूनच जन्मास येतात त्या गुंड टोळ्या..देहविक्री व्यापार…घडणारे भयंकर गुन्हे..
अवैध धंदे मुळे येथील सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्यार्थी, नव पिढी, अल्पवाईन मुले मुलींवर, सुद्धा या सर्व गोष्टीचा वाईट परिणाम होत असून अश्या नाईट लाईफ मुळे भविष्यात कोणती तरुण पिढी निर्माण होईल याची कल्पना येतेय….अवैध धंदे मुळे होणारा त्रासा बाबत विमाननगर परिसरातील नागरिक आत्ता आंदोलनाचा इशारा देत आहेत. तरी विमाननगर विभागातील पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकाराची दखल घेऊन लवकरात लवकर या प्रकाराला आळा घालण्याची खूप गरज आहे.