धडक कारवाई | वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर|सराईत घरफोडी करणा-या गुन्हेगारांना ठोकल्या बेडया

पुणे : खादी एक्सप्रेस प्रतिनिधी : सराईत घरफोडी करणा-या गुन्हेगारांना ठोकल्या बेडयावारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुर नं २८८/२०२१ भादविकलम ४५४.३८०,३४ या गुन्हयाचातपास करीत असताना पोलीस उप निरीक्षक मुंढेपो.ना अमोल राऊत यांनी यातील आरोपीचा कसोशिने शोधघेतला असता गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती वरुन वरून इसम नामे पदमाकर भगवानराव जोशीवय ४६ वर्षे रा.धायरी पुणे, यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांने व त्याचे साथीदार नामे अर्चनासुधिर खाडे वय ४० वर्षे रा.मरकळ रोड आळंदी निलीमा नितीन जोशी वय ४४ वर्षे रा.जुना बसस्टॅण्ड जवळआळंदी यांनी एकत्रीत आळंदी,वारजे व उत्तमनगर भागामध्ये घरफोडी केली असल्याचे तपासा मध्ये निष्पण्णझाले. त्यांचे कडून वारजे पोलीस स्टेशन कडील ३ घरफोडी, उत्तमनगर पोलीस स्टेशनकडील १ घरफोडी वआळंदी पोलीस स्टेशनकडील १ घरफोडी असा सोने,चांदी व रोख रक्कम एकुण ३३,४०,000/- रू चीघरफोडी उघडकीस आणून उल्लेखनिय कामगीरी केलेली आहे.

सदर गुन्ह्यात अंदाजे मिळून 54.5 तोळे सोने (रु 25 लाख, चालू किंमत), 4.8 किलो चांदी(रु 3लाख चालू किंमत), रोख रक्कम 4,60,000/- आणि दोन मोटासायकल (80 हजार ) असा एकूण 33 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त झालेला आहे.सदरची कामगीरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर,श्री.राजेंद्र डहाळे,पोलीस उप आयुक्त परिमंजळ ३ पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग पुणेश्री.गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर खटके, पोलीस निरिक्षक अमृतमराठे,पोलीस उप निरीक्षक नरेंद्र मुंढे,मनोज बागल, पो.ना गोविंद फड,अमोल राऊत,अण्णा काटकर, पो.शि.बाळूशिरसाठ, रमेश चव्हाण,अजय कामठे, नितीन कातुई व विजय भुरूक यांनी केलेली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल