धक्कादायक…! हडपसर परिसरात बंदुकीच्या धाकावर मारहाण करून ५० हजारांना लुटले…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): हडपसर, मगरपट्टा सारखा गजबजलेला परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली, मेगा सेंटरच्या पार्किंग मध्ये शुक्रवार दि. २४ रोजी रात्री ९ च्या सुमारास काही लोक पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाडी समोर दारूपीत बसले होते, त्या दरम्यान ईजाज मजीद पठाण (वय ३४. रा. सिद्धी विनायक कॉलनी, हडपसर) हे आपली गाडी घेण्यासाठी आले असता दारू पीत बसलेल्या सुभम कांबळे व त्याचे तीन साथीदारांना गाडी पासून दूर सरकण्यास सांगितले, आम्हाला असे का सांगितले याचा राग धरून सुभम कांबळे व त्याचे तीन साथीदार यांनी ईजाज यांना शिवीगाळ करून सुरवातीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर शुभम कांबळे याने फिर्यादी ईजाज यांस बेसबॉल स्टिकने मारहाण करून त्यांना जखमी केले, सोबतच फिर्यादी यांची गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले त्या वेळेस गाडी मध्ये असलेली फिर्यादी यांची ५० हजार रोख रकमेची बॅग रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सदर आरोपी यांनी लुटून नेली. सदर प्रकारची तक्रार फिर्यादी ईजाज यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोमण करीत आहे.आयटी, मॉल सारख्या परिसरात अश्या घटना घडतात याचा अर्थ अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस आणि कायद्याचा कोणताच धाक, भीती नाही हे खरे…आणि याच गोष्टीमुळे गुन्ह्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होतेय…

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल