धक्कादायक | तलाठी असलेल्या पती कडून डॉक्टर पत्नीची डोक्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या | नायडू हॉस्पिटल
🛑 पुणे ( खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ) : शिकल्या सावरलेल्या तलाठी पती कडून डॉक्टर असलेल्या पत्नीची चारित्र्य संशयावरून डोक्यात धारधार शस्त्राने आणि हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील मोशी येथे शनिवारी ( दि.४ ) रात्रीच्या सुमारास घडली.आरोपी विजय कुमार साळवी हा जुन्नर गावच्या आळेगाव चा तलाठी असून पत्नी सरला विजय साळवी ह्या पुण्याच्या नायडू रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवारत होत्या. साळवे दांपत्याने नुकतेच मोशी येथे नवीन फ्लॅट खरेदी केला होता. शनिवार ( दि ४सप्टेंबर) रोजी घराची गृहशांती चा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम झाल्यानंतर साळवे दाम्पत्य शनिवारी रात्री मोशी येथील फ्लॅट मध्ये मुक्कामास थांबले. रविवारी दोघांचेही फोन बंद असल्याने आणि फ्लॅटचा दरवाजा उघडत नसल्याने नातेवाईकांनी भोसरी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला तेव्हा सरला साळवे यांचा मृतदेह आढळून आला. मयत सरला यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने आणि हातोड्याने वार करून हत्या करण्यात आली होती. घटना स्थळी पोलिसाना विजय यांनी लिहलेले चिठ्ठी सापडली त्या मध्ये ” पत्नी मला साथ देत नाही” असे लिहण्यात आले आहे. चारित्र्य संशयावरून हत्या केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे. आरोपी पती विजय साळवी सध्या फरार असून भोसरी एम आय डी सी पोलिसांकडून आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.केवळ चारित्र्याच्या संशयावरून सुखी संसाराची सुरवात होण्या आधीच राखरांगोळी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.