धक्कादायक…. ! कोंढवा NIBM मध्ये डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : कोंढवा,एन आय बी एम साईबाबा मंदिर जवळ आज (०२ जानेवारी) रक्ताच्या थारोळ्यात, महिलेचा मृतदेह आढळून येताच परिसरात एकाच खळबळ उडाली, ३०-३५ वय वर्षाच्या या मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेहाच्या हातावर रेणुका, भानू, संतोष, अश्विनी अशी नावे गोंदलेली असून मृतदेहाच्या अंगावर व्हाईट कुडता ट्रक पॅन्ट (डार्क निळा रंग व्हाईट चेक्स यलो पट्टी) होती.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. प्रथमदर्शनी त्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून, पोलिसांनी तात्काळ मयत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केले, अज्ञात मारेकऱ्यांनी इतका निर्गुण खून केला आहे की महिलेचा चेहऱ्यावरून ओळख पटने शक्य नसल्याने वर्णन केलेल्या महिलेची कोणतीही माहिती असल्यास कोंढवा पोलिसांना संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. कोंढवा पोलिसां मार्फत पुढील तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल असा विश्वास दिला आहे.
सहा पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मा, राजेश उसगावकर साहेब मो. नं, 7350547007