ठकबाजी करून मारहाण तब्बल २ कोटी चा गंडा – उद्योजक पाषानकर सोबत आणखी तिघा विरोधात गुन्हा दाखल.

पुणे ( खादी एक्सप्रेस ऑनलाइन ): पुण्यातील उद्योजक गौतम पाषानकर आणि आणखी तिघांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मारहाण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .फसवणुकीचा हा प्रकरण २ वर्षा पूर्वी पासून सुरू झाला फिर्यादी नरेंद पंडितराव पाटील ( वय ४२ रा. सिल्व्हर स्प्रिंग सोसायटी पंचवटी ) यांनी प्रॉकसिमा क्रिएशन कन्स्ट्रक्शन बिल्डिंग (खराडी ) यांच्या सी (c) बिल्डिंग मध्ये P -101आणि 102 हे दोन सदनिका घेण्याचे ठरविले ज्याची २ कोटी ४० लाख रुपये किंमत ठरवून तसा लेखी करार देखील करण्यात आला.फिर्यादीने सदनिकांची निश्चित किंमत २ कोटी ४० लाख रुपये देखील जमा केली. परंतु मिळकती चा ताबा आणि नोंदणीकृत दस्त न करता नरेंद्र पाटील यांची फसवणूक करून , P १०१ सदनिका गणेश शिंदे ( वडगाव शेरी) यांच्या नावावर करून P १०२ ya सदनिकेचे खरेदीखत सुनील झोरर तर्फे कुलमुख्यात म्हणून मनीष गोरद ( रेंजन्हील) यांच्या सोबत केले. फिर्यादीने या बाबत जाब विचारला असता त्यांना ८ जून २०२० रोजी जंगली महाराज रोड च्या पाषानकर ग्रुप क्या कार्यालयात बोलवून फिर्यादी नरेंद्र यांना मारहाण करण्यात आली यात त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे. या सर्व प्रकरणात गौतम पाषानकर , दीप विजय पुरोहित ( कल्याणी नगर ) ,रीनल पाषानकर ( शिवाजी नगर ) यांच्या विरोधात कलम ४०९ , ४२० , ३२६, ५०६, ३४ या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल