चिटणीस युवक काँग्रेस पुणे शहर अभिजीत साळवे यांच्या विरोधात पुणे सायबर सेलकडे तक्रार दाखल – तु माझ्या ऑफिसला ये मला भेट नाही तर मी तुझ्याविरुद्ध तक्रार करेन

पुणे (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ) : प्रसिद्ध व्यवसायिक अरबाज सय्यद यांनी चिटणीस युवक काँग्रेस पुणे शहर अभिजीत साळवे यांच्या विरोधात पुणे सायबर सेलकडे तक्रार दाखल केलेली असून या तक्रारीमध्ये अरबाज सय्यद यांनी नमूद केले आहे की, अभिजीत साळवे हे माझ्याकडे कामाला होता, सध्या तो काँग्रेस पक्षासाठी काम करतो. मला मागील चार महिन्यापासून फोन करून इलेक्शनसाठी पैसे लागत आहेत मला द्या. त्याकडे मी दुर्लक्ष केले. ८ सप्टेंबरला तो मला फोन केला, तु माझ्या ऑफिसला ये मला भेट नाही तर मी तुझ्याविरुद्ध तक्रार करेन, त्याकडे देखील मी दुर्लक्ष केले. परंतु १० तारखेला फेसबुकवर लाईव्ह येवून माझ्या विरोधात खोटेनाटे आरोप केले आदी बाबी या तक्रारीमध्ये म्हटलेले आहेत. अशा प्रकारची तक्रार सायबर सेल कडे दि. १४/०९/२०२१ रोजी दाखल करण्यात आलेली आहे. सदरील तक्रारीची खात्री करण्याबाबत वचौकशीसाठी खादी एक्सप्रेसने फोन लावल्यावर अभिजीत साळवे यांनीसांगितले की, माझ्याकडील जे पुरावे आहेत ते मी योग्य ते अधिकाऱ्याकडे सादर करेन.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल