चंदननगर – शैलेश घाडगे खुन प्रकरणातील आरोपींना आखेर….मे. पुणे न्यायालयाचा निर्णय…..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): साल २०२०, नैवेद्यम हॉटेल परिसरात शैलेश दत्तात्रय घाडगे, (वय २३ वर्षे) याचे पूर्ववैमनस्यातून डोक्यात, चेहऱ्यावर सिमेंटचे ब्लॉक, लाकडी वासा व दगड घालून खून करण्यात आला होता, सदर घटनेने पुण्यातील खराडी परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती, सदर प्रकरणात मयत शैलेश घाडगे यांचा मोठा भाऊ निलेश घाडगे यांच्या फिर्याद वरून चंदननगर पोलिसांनी राजू अस्वले (रा. चंदन नगर, पुणे), सुनील पाटील(रा. खराडी, पुणे) , विशाल रमेश भादवे (रा. चंदन नगर, पुणे), आकाश देवकर (रा. येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली होती. त्यातूनच सदर प्रकरणा बाबत मे. सेशन न्यायालय, पुणे येथे ॲड. मनुजा साळवे, ॲड. अलका गायकवाड, ॲड.ऋषिकेश शेलार व ॲड. प्रियंका घाडगे यांनी सदरील प्रकरणातील मुख्य आरोपी राजु तुकाराम अस्वले, व सुनील पाटिल यांच्या बेल करिता याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर निर्णय देत राजु तुकाराम अस्वले याची ३ वर्षा नंतर बेल मिळवून दिली.तसेच इतर अटक आरोपी आकाश देवकर यांस मे. मुंबई उच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२३ रोजी व अटक आरोपी विशाल भादवे यांस मे. सुप्रीम न्यायालयाकडून दि. २ ऑक्टोंबर २३ रोजी बेल करण्यात आली आहे.दाखल आरोपा नुसार, राजु तुकाराम अस्वले याचे शैलेश घाडगे सोबत जुलै २०१६ मध्ये भांडणे होवुन आरोपी राजु अस्वले याचेविरुध्द गुन्हा दाखल झालेला होता, तसेच शैलेश घाडगे हा देखील सराईत गुन्हेगार असून सन २०२० मध्ये पॅरोलवर बाहेर असताना पुन्हा त्याचे पुन्हा राजु तुकाराम अस्वले सोबत पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ व वाद झाला त्यातूनच राजू आणि त्याचे इतर साथीदार सुनील पाटील , विशाल रमेश भादवे , आकाश देवकर यांनी मिळून सदरील वाद शेवटी शैलेश घाडगे याच्या खूनावर जाऊन थांबवला.