कोयत्याने वार आणि लूट पुण्यातील “या” चौकात चोरट्यांचा सुळसुळाट ! २ अल्पवयीन सह ७ आरोपी अटकेत.
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाईन : दिवसा गजबजलेल्या असणाऱ्या संगमवाडी ते सदलबाबा चौकात रात्रीच्या वेळी तेवढाच सुकसुकाट असतो आणि याचाच फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळीचा उद्रेक या भागात वाढला आहे. कोयत्याचा धाक दाखवून रात्री येणा जाणाऱ्या लोकांना लुटण्याच्या अनेक घटना समोर येत असून त्यामुळे या परिसरातील लोक आणि रात्री प्रवास करणाऱ्या मध्ये एकच दहशत पसरली आहे .या परिसरातील एका टोळक्याने ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सायकल वरून घरी जाणाऱ्या मनीष कुमार उमाशंकर मिश्रा ( वय २५, रा. रामनगर येरवडा ) यास संगमवाडी ते सादलबाबा चौका दरम्यान दोन दुचाकीस्वारांनी अडवले व कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी मनीष यांच्याकडे पैशाची मागणी केली, त्यांच्या मागणीला नकार देताच त्या पैकी एकाने फिर्यादीच्या मनगटावर कोयत्याने वार करून जखमी केले. फिर्यादीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता. चोरट्यांचे आणखी ५ साथीदार ३ दुचाकी घेऊन आले आणि फिर्यादी कडून रोख रककम २० हजार रुपये आणि मोबाईल चोरून तेथून पळ काढला .फिर्यादीच्या तक्रारीनुसार येरवडा पोलिसांनी २ अल्पवयीन आरोपी सोबत ७ जणांना ताब्यात घेतले आहे.
सनी रमेश पवार ( वय १८ )
दीपक दत्ता पवार ( वय २३)
आसिफ सलीम शेख ( वय २५)
शुभम सुनील देशपांडे ( वय २२) सर्व राहणार दिघी असे अटक आरोपींनी नावे असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आळेकर करीत आहे .