कोंढव्यामधील शासनाने काढलेल्या बांधकामावर परत बांधकाम करणाऱ्या विरुद्ध विश्वमानव अधिकार परिषद : इनाम गुडाकुवाला यांचे व्यक्तव्य
पुणे (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी) : अतिक्रमण विभाग व पोलिसांनी कोंढव्यामधील बांधकाम पाडल्यानंतर देखील तसेच सदरील बांधकाम परत करू नये म्हणून केलेल्या खड्यावर परत बांधकाम करणाऱ्या लोकांच्या विरोधात नुकतेच विश्व मानव अधिकार परिषदेचे इनाम गुडाकुवाला यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्यकाडे निवेदन दिले आहे. ‘खादी एक्सप्रेस’ मध्ये कोंढव्यामधील पाडलेल्या बांधकामावर परत बांधकाम व अतिक्रमण करण्याची बातमी मागच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती.याबातमीची दखल बऱ्याच जणांनी घेतली.तसेच सोशल मिडीयावर सदरील बातमी मोठ्या प्रमाणावर पसरली विश्व मानव अधिकार परिषद तर्फे इनाम गुडाकुवाला जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार घेवून तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करा असे म्हणत आंदोलनाचा पवित्रा घेतला. याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मागील जी गुन्हे दाखल करण्यात आली त्यामध्ये कलम वाढ करण्यात यावी असे देखील त्यांनी सांगितले. कोंढवा मधील बांधकाम मानवी जिवीतास धोकादायक आहे. जी बांधकाम पाडली गेली ती शासनाच्या आदेशानुसार पाडली गेली. खादी एक्सप्रेस यांनी बातमी प्रकाशित करताच सदरील विषयाला चर्चा आलेली आहे. स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणा-या लोकांनी बांधकामाबाबत अर्ज, विनंत्या केल्या, परंतु लवकरच त्यांनी माघार घेतली. अश्या लोकांची देखील चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले. आणि या पाडलेल्या बांधकामावर जे नवीन बांधकाम चालू असेल त्याच्यावर ताबडतोब न्यायालयीन आदेश घेवून हे बांधकाम थांबवणे आवश्यक आहे. तसेच हे अनाधिकृत बांधकाम करताना सदरीलल भागातील नगरसेवकांनी देखील याबाबत शासनाला कळणे आवश्यक आहे.
कोंढवा मधील गुंठेवारी मधील बांधकाम करणारे लोक व त्यावर नगरसेवकांची काय भूमिका पुढील अंकात कोंढवा मधील अनाधिकृत बांधकामाबाबत ७२७६२९८८८५ वर आपण विचारू शकता? आपले प्रश्न नगरसेवकांपर्यंत आम्ही घेवून जाणार आहोत. पुढील अंकात कोंढवामधील गुंठेवारी अतिक्रमणाबाबत नगरसेविकांची भूमिका व त्यांनी काय केले याचा जाब जवाब त्यांना विचारला जाणार आहे. त्यामुळे पुढील अंक राखून ठेवावा