कोंढव्यात गैरहजर मतांची हजेरी…! मतदाराच्या अधिकारांवरील मुजोरीने एकच खळबळ..
खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ऑनलाईन ( शोएब नदाफ ) : Pune Election | आज २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाने मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीला काहीसा थंडावा मिळाला आहे, पण आज कोंढवा हडपसर मतदार संघ येथील घटनेने इतक्या दिवसापासून प्रयत्नात असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उभा राहिला आहे, घडले असे की, महिला जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली असता, त्यांनी मतदान न करताच त्यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला.सदर बाबत संबंधित महिलेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले मतदान न झाल्याचे सांगून पडताळणीची मागणी केली. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी पडताळणी करण्यास नकार दिल्याने महिलेने नाराजी व्यक्त केली आहे. “मी अजून मतदान केलेच नाही, पण माझ्या नावासमोर मतदान झाल्याचा उल्लेख आहे,” असे संबंधित महिलेने माहिती देऊनही निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकाराची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मतदारांच्या हक्क अधिकारांवर सुरू असलेल्या मुजोरी मुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे..