कोंढव्यातील DJ चा नगर सेवक करणार वॉल्युम ऑफ…! कोंढवा पोलिसात निवेदन दाखल.
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): पैगंबर ख्वाजा गरीब नवाज ज्यांनी समाजात, एकात्मता, प्रेम, त्याग,एकमेकांसाठी मदतीची भावना असे संदेश दिले, ज्या सणा मध्ये खीर वाटून सण साजरा केला जातो. पण या संदेश कडे दुर्लक्ष करून ख्वाजा गरीब नवाज यांची छट्टी साजरी करण्याचा मूळ उद्घेश विसरून मागील सतत एका महिन्या पासून कोंढवा परिसरात छट्टी सणाच्या नावा खाली वाजविण्यात येणाऱ्या डीजे विरोधात आखेर कोंढव्यातील नगरसेवक आणि उलमा यांनी NGO आणि नागरिकांनी आक्षेप थोडक्यात अश्या चुकीच्या पद्धतीने सण साजरी केल्या जाणाऱ्या प्रकारा विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात आपले निवेदन दखल केले आहे. ख्वाजा गरीब नवाज यांच्या छट्टी चा सण साजरी करण्याच्या नवा खाली सतत मोठ्या आवाजत डी जे लावणे, दारू पिऊन डान्स करणे, परिसरात राहणाऱ्या लोकांना होणाऱ्या त्रासाचा काडीचाही विचार न करता आपल्याच धुंदीत राहणे असे गैरकृत्याच्या प्रकार बाबत हाजी फिरोझ, गफुर पठाण, राईस सुंडके, कोंढव्यातील नागरिक तसेच NGO यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे पी. आय यांच्या कडे निवेदन दाखल करण्यात आले. चुकीच्या पद्धतीने सणाच्या नावाखाली गैरप्रकार करणे ही तर नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजी हाजी फिरोझ यांनी ही मांडली की असे डीजे लावणे, लाईटीचे शुशोभीकारण या सर्वांना एका दिवसा साठी लाख ते दीड लाख पर्यंतचा पैसा खर्च होतो तर मागील एका महीन्या पासून वाजणाऱ्या या डीजे साठीचा पैसा देतोय कोण …? येवढे पैसे आले कुठून…? या प्रकाराला कोंढवा परिसरातील नगर सेवक रईस भाई, गफुर पठाण, हाजी फिरोझ यांचा या गैरप्रकरांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही तर हा पैसा आला कुठून..? या मूळे हेतु पुरस्पर एका समाजाला बदनाम करण्याचा तर प्रयत्न नाही ना असे ही प्रश्न हाजी फिरोझ यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे पी.आय समोर मांडले, सोबतच या गोष्टीची सखोल तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील नगरसेवक, नागरिकां कडून करण्यात आली. सोबतच हाजी फिरोझ यांनी पुढे असे ही सांगितले की “निवेदन दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सतत डी.जे वाजण्याच्या या प्रकारावर आणि स्वतः जातीने लक्ष देऊन, आम्ही पुरेपूर या गैरकृत्याला विरोध करू”.
कोंढवा परिसरातील नगर सेवकांनी युवकांना अशीही विनंती केली :
* सणाचा मूळ, प्रेरणादायी, उद्देश लक्षात ठेऊन प्रत्येक समाजातील या खास दिवसाला एका सणाप्रमाणेच साजरी करा.
* कोणत्याही गैरकृत्यात् सहभागी होऊन गैरप्रकार करू नका.
* Dj, सुशोभिकरण, अश्या व्यर्थ गोष्टी साठी पैसा खर्च करण्या पेक्षा त्याच पैशांचा उपयोग गरजू लोकांच्या मदती साठी करा.
* योग्य ठिकाणी पैसे वापरून, गरजु लोकांची मदत करून सणाच्या मूळ उद्देशाला आमलात आणा जेणे करून पैगंबर, आणि एतीहासिक महापुरुष ज्यांनी चांगल्या पिढी साठी, समाजासाठी आपले जीवनाचा त्याग केला त्यांच्या संदेशाची जान ठेवा.
* कोणत्याही नाशापणीला बळी पडू नका.
* Dj, डान्स च्या नावाखाली नशापणी, दारूचे सेवन करून समाजात सणा विरुद्ध चुकीचा संदेश पुढच्या पिढीला देणे टाळा.
* सणाच्या मूळ उद्देश,हेतु लक्षात घ्या आणि तो स्वतः अमलात आणा.