कोंढव्यातील सांस्कृतिक सभागृहे उघडण्यासाठी आंदोलन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे उपायुक्तांना निवेदन
खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ऑनलाईन :- स्थानिक माजी नगरसेवकांच्या वर्चस्वाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने बंद केलेले कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर आणि शिवनेरी नगर मधील सांस्कृतिक सभागृहे (हॉल ) पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आणि कोंढव्यातील नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन केले आणि समाजकल्याण विभागाचे उपयुक्त चव्हाण यांना निवेदन दिले. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.
पालिकेने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्न समारंभाकरीता शिवनेरीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि साईबाबा नगर येथे इमाम अबू हनीफा नावाने सांस्कृतिक सभागृह (हॉल ) बांधण्यात आले आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिक त्याचा वापर करतात. येथील स्थानिक माजी नगरसेवकांनी स्वतःच्या वर्चस्वासाठी सभागृहाचा वापर केला आणि किल्ली स्वतःजवळ ठेवून अडवणूक केली. पालिकेने प्रशासकीय काळात हि सभागृहे बंद करून ठेवली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तेथे कार्यक्रम करता येत नाहीत . या सभागृहांच्या बुकिंग साठी रीतसर व्यक्ती नेमून काम सुरु करावे ,अशी मागणी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने निवेदनात केली आहे.
यावेळी इब्राहिम खान,इब्राहिम शेख,शहबाझ पंजाबी,इसाक शेख,वहाब पटेल,अरिफ शेख,अयुब शेख,संतोष जाधव,अहमद पिरजादे,सुनील साठे अक्शन कमीटि अध्यक्ष जाहिद शेख,रियाज मुल्ला,सचिन आल्लाट,रियाज बंगाली,रशिद शेख,आरीफ शेख,सुरेश गायकवाड व इतर स्थानिक नागरीक उपस्थित होते.