कोंढव्यातील मुजोर हॉटेलांना API भाबड तर्फे खटल्याचे आमंत्रण….!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : कोंढवा, पारगे नगर परिसरातील हॉटेल, टपऱ्या जे सर्रासपणे मुजोरी कायम ठेऊन मागील अनेक दिवसांपासून म.न.पा आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन रोज पहाटे 4-5 पर्यंत हॉटेल, दुकाने, टपऱ्या सुरू ठेऊन परिसर दणाणून ठेवले होते अश्या हॉटेल धारकांचे कोंढव्यातील सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे व गुन्हे पोलीस निरीक्षक मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली API विश्वास भाबड,API उसगावकर आणि त्यांच्या पथकाने चांगलेच धाबे दणाणले आहे. कोंढवा पोलिसांनी पारगे नगर, कोंढवा परिसरातील अनेक हॉटेल आणि टपऱ्या विरोधात तब्बल 14 ते 15 खटले दाखल केल्याने मुजोरी हॉटेल आणि टपऱ्या धारकांना नियमांची चांगलीच शिकवण मिळाली आहे. पारगे नगर, कोंढवा परिसरात रात्रभर तसेच पहाटे 5 पर्यंत सुरु असणारे टपऱ्या आणि हॉटेल मध्ये रात्रभर ‘डीजे’चा दणदणाट, टपऱ्या हॉटेल वर येणाऱ्या लोकांची गजबज, वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदुषण यावर त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत, API विश्वास भाबड आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि टपऱ्या धारकांना नियमाचे पाठांतर झाले आहे, ज्या मुळे या परिसरात नाईट लाईफ मोठ्या प्रमाणात संपुष्टात आलेली दिसून येत आहे, परिणामी स्थानिक नागरिकांना API भाबड आणि त्यांच्या पथकाने केलेल्या दबंग कारवाईने कोंढवा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडत कोंढवा पोलिसांचे आभार व्यक्त केले …कोंढवा पोलीस विभागातील अश्या कर्तव्यनिष्ठ आणि सज्ज पोलिसांमुळे कोंढवा परिसरात मुजोरांना उच्छांड मांडण्याच्या विचारानेच घाम सुटेल….!

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल