कोंढव्यातील नागरिकांची ‘भोंगा’ वक्तव्यावर प्रतिक्रिया.. व्हिडिओ व्हायरल…..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुस्लिम समाज विरोधातील वक्तव्यावर कोंढवा येथील नागरिकांचे नाराजीचे सूर उमटायला सुरवात झाली आहे परिणामतः कोंढवा खुर्द येथे २०१५ साली माजी नगरसेवक आरती साईनाथ बाबर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “नुरनी कब्रस्तान” च्या फलकावर उद्घाटक म्हणून राज ठाकरे यांचे नाव मुद्राकित केले होते त्या नावावर कोंढवा परिसरातील नागरिकांनी काळे पेंट लावून राज ठाकरे यांचे नाव काढून टाकून राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आपला राग व्यक्त केला आहे, सोबतच म.न.से (कोंढवा विभाग) येथील नगरसेवक साईनाथ बाबर यांनी लवकरात लवकर म.न.से पक्षाला राजीनामा द्यावा अशी मागणी देखील नागरिकांना कडून करण्यात येत आहे.