कोंढव्यातील ‘त्या’ निर्घृण हत्येच्या आरोपींना पोलिसांकडून अवघ्या २४ तासात अटक….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : काल ( ०२ जानेवारी) रोजी कोंढवा एन.आय.बी.एम. महिलेचा मृतदेह मेफैर एलेगांझा सोसायटी समोरील झाडाझुडपात विवस्त्र अवस्थेत आढळून येताच परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले, आरोपींनी महिलेची दगडाने टेचून अत्यंत निर्घृण पणे हत्या केली ज्याने महिलेची ओळख पटून माहिती मिळवण्याचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले, निर्घृणपने झालेल्या या हत्याकांडा मुळे पोलीस सुव्यवस्था पुढे मोठे प्रश्न निर्माण झाले, परिसरात निर्माण झालेली भीती आणि निशब्द होऊन लोकांकडून पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था आणि सुरक्षे बाबत प्रश्न विचारणारे डोळे….पण कोंढवा पोलीस विभागाने तेवढ्याच ताकदीने आपली तपास यंत्रणा अलर्ट करत तपासाची सूत्रे हाती घेऊन खुनाचा तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज,लॉजेस, सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार, ई. मार्गाने तपास सुरू असतानाच ASI मनोळकर व पो. शि. जयदेव भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपी नामे 1)आयान फैजान सय्यद (वय 15 वर्ष) रा. शिवनेरी नगर लेन नंबर 11 कोंढवा पुणे आणि 2) जहेद आसिफ शेख (वय 20 वर्षे) रा. लेन नंबर 11 शिवनेरी नगर कोंढवा पुणे. यांना अटक करण्यात आणि असून दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला, अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या योग्य त्या कडक कलमां अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला कोंढवा पोलिसांनी तत्परतेने अवघ्या २४ तासात आरोपींचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या ज्यामुळे कोंढवा पोलीस विभागाची प्रशंसा केली जात आहे, अश्या तत्पर दाखल आणि कडक कारवाई मुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांना आळा बसेल यात शंका उरली नाही. कोंढवा पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय मोगले यांच्या मार्गदर्शना खाली स. पो. नि. अनिल सुरवसे पो. हवा. अमोल हिरवे पो. अंमलदार गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, राहुल रासगे, सुहास मोरे, जयदेव भोसले, यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.