कोंढव्यातील अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कार्यवाही नंतर देखील परत बांधकाम करणाऱ्यांचा उद्रेक

पुणे (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी): कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामाकडे खादी एक्सप्रेस शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे म.न.पा. अतिक्रमण विभागाने कोंढव्यातील गुंठेवारी अतिक्रमणवर कार्यवाही केली आणि त्यांची कार्यवाही झाल्यानंतर कायद्याची भिती या अतिक्रमण धारकांना राहिली नाही. सदरील पाडलेल्या बांधकामावर व खड्डे करण्यात आलेल्या ठिकाणी परत बांधकाम करून या अनाधिकृत बांधकामधारकांनी उच्छाद मांडलेला आहे. कायदा याबाबत काय सांगते सेक्शन ७४ बारावी अनुसुचित १९९२ प्रमाणे आपल्या भागातील अनधिकृत कृत्य रोखणे ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि याबाबतचा उल्लेख महाराष्ट्र म्युनिसपल ॲक्ट यामध्ये मोडते. पी. एम. आर. डी. नियमावली तपासल्यास पुणे शहराच्या हद्दी लागतचे क्षेत्र पी.एम.आर.डी.चे कक्षेत येते.या ठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामावर अत्यंत कठोरपणे कारवाई केली जाते. संपूर्ण इमारतीच्या पायापासून सर्व कॉलम तोडून आकले जाते जेणेकरून पुन्हा बांधकाम उभे करणे बिल्डरला अवघड होते अशी कारवाई पुणे महानगरपालिका कधी करणार? आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुणे च्या नागरिकांकडून होत आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच कायदे अभ्यासक अस्लम इसाक बागवान (इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप) यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, गुंठेवारी ही २००७ या साली बंद झाली. त्यानंतर देखील शासनातर्फे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असून शासनातर्फे टप्पे शिक्के मारून या गुंठेवारीच्या मालमत्ता विकल्या जात आहेत, सदनिका विकल्या जात आहेत. या मालमत्ता गुंठेवारीमधील असल्यानंतर खरेदी विक्रीचा प्रश्न, त्यावरील सदनिका, त्यावरी बांधकामाचा प्रश्न आणि याला परवानगी देणोर आर्किटेक, बिल्डर, ठेकेदार, मालमत्ता धारक शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व चौकशी शासनाने करावी.

कोंढवा भागातील नगरसेवक व अनधिकृत बांधकामाविषयी संपर्क केल्यावर खालील प्रकारचा प्रतिसाद खादी एक्सप्रेसला मिळाला.
१) नगरसेवक अॅड. हाजी गफूर पठाण : यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यानंतर ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला.
२) माजी नगरसेवक रईस सुंडके : यांनी सांगितले की महानगरपालिकेला वेळोवेळी तक्रार केलेली आहे. अर्ज, विनंत्या केलेल्या
आहेत आणि याबाबत माझा लढा अद्यापी सुरू आहे.
३) नगरसेवक साईनाथ बाबर : यांच्याशी प्रत्यक्षात भेटल्यावर अनाधिकृत बांधकामाबाबत त्यांनी बरीच माहिती दिली आणि त्यांनी स्वतः या बांधकामावर आवाज उठवला, तक्रारी केल्या हे सांगितले त्यांचे कार्य एवढे मोठे आहे की ते सांगणे कठीण आहे पुढील अंकात साईनाथ बाबर यांची कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामाबाबत त्यांची विशेष मुलाखत प्रकाशित करेल.

पुढील अंकात कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामामुळे हक्कधारित लोकांना होणारा त्रास कसा?
खादी एक्सप्रेस यांनी कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामावर भाष्य सुरू केल्यावर हक्कधारक बांधकाम करणाऱ्या लोकांनी व्हॉट्सअप, फेसबुक, फोन करून व सोशल मिडीयाच्या माध्यमातून खादी एक्सप्रेस यांना संपर्क केला आणि ऊन, वारा, पाऊस या त्यांच्या मुलभूत हक्कावर कश्या प्रकारे गदा येत आहे हे स्पष्ट केले. वजीर कासकेड, शालम हाईट्स, कॅन्टहिल्ट व्हिव्ह आणि टेम्पल टॉवर या मधील राहणाऱ्या लोकांनी त्यांना अनधिकृत बांधकाम केलेल्या आजूबाजूच्या बिल्डिंगमुळे होणाऱ्या अडचणी आणि त्यांना कशा प्रकारे त्रास झाला हे सांगितले. याचा लेखाजोखा पुढील अंकात तसेच ज्या ज्या लोकांना या अनाधिकृत बांधकामाचा त्रास होत आहे त्यांनी खादी एक्सप्रेस ७२७६२९८८८५ या नंबरवर संपर्क करावा.

bit.ly/3DOyJsl

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ७२७६२९८८८५ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक आणि ट्विटर वर फॉलो करा…!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक
: https://www.facebook.com/Khadi-Express-104927461897754/

आमच्या ट्विटर पेज’ची लिंक
:https://twitter.com/KhadiNewsExp?t=_wvCUFaT5m_FWp56Lx4ICQ&s=08

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल