कोंढवा: TIMS प्राध्यापिकेची शाळेला लाखोंच्या खंडणीची मागणी….पैश्याच्या लालचेत मुलांचे भविष्य धोक्यात..व्हिडिओ पहा…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) : ” कोणी पैसे देता का हो पैसे…” अशीच काहीशी परिस्थिती सध्या कोंढव्यात काही लालची लोकांची आहे…पैसे लुबडण्यासाठी समाजसेवक म्हणून तात्पुरता मुखवटा लावून अनधिकृत बांधकाम, बॅनर, दुकाने यांच्या ना त्या उचापती करून तक्रारी द्यायच्या, अन् तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे मागून आपला उदरनिर्वाह चालवायचा…पण या लालची लोकांनी आपली पातळी एवढी खाली पडली की त्यामुळे कोंढवा मधील तकवा इस्लामिक शाळेत शिकणाऱ्या ६०० पेक्षा जास्त मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे,
नेमकी घटना :-
उस्मान अत्तार, शाळेचे संचालक ( प्रेसिडेंट ) यांचं म्हणणं असे की :- आमच्या शाळेत म्हणजेच कोंढवा कौसरबाग परिसरातील ” तकवा इस्लामिक मकतब शाळा ” काही दिवसापूर्वी याच परिसरात राहणारी महिला नामे नाजिया खान हिने शाळेत प्राध्यापिका (तात्पुरत्या कालावधीसाठी) म्हणून रुजू झाली, परंतु अवघ्या ३० दिवसाच्या कार्यकाळात मुलांना तासनतास उभे ठेवणे, वर्गा बाहेर काढणे, तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धमकावणे अश्या प्रकारामुळे नाजीया विरोधात शाळेत पालकांच्या तक्रारी वाढल्याने उस्मान अत्तार यांनी या बाबत जाब विचारला असता “तुमची शाळा कशी चालते तेच पाहते ” असे धमकावून शाळे विरोधात वकीला मार्फत नोटीस पाठविली, ज्या मध्ये ” मुझे ३० दिन का पगार नाही ५ लाख चाहिए” अशी मागणी देखील केली, जर पैश्याची मागणी मान्य केली नाही तर शाळेला बंद पडण्याची धमकी दिली,
सदर मागणी पूर्ण होणार नाही हे दिसताच नाजिया खान या महिलेने सलीम मुल्ला यास हाताशी धरून शासनाच्या अधिकारांचा गैरफायदा घेत, माहिती अधिकार, तसेच खोट्या तक्रारी देण्यास सुरवात केली, ईमेल, व्हॉट्स ॲपद्वारे शाळेची बदनामी करण्यास सुरवात केली, उस्मान अत्तार आणि त्यांच्या पत्नी कडून सदर महिला नाजीया खान यांच्या विरोधात खंडणी, मानसिक त्रास बाबत तक्रार दाखल करण्यात आले आहे…पण या सर्व प्रकरणामुळे या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भविष्यावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे,
सदर घटनेची दाखल घेऊन कोंढवाचे नगरसेवक मा. गफ्फुर पठाण यांनी देखील पालकांशी चर्चा केली
- हे सर्व काही फक्त एक सादिश चालू आहे, आर.टी.आय. चे काही लोक, तर काही संस्था ” हम आंदोलन करेंगे, हम आंदोलन करेंग..तक्रार करेंगे” ही एकच रट लावून केवळ वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी कट कारस्थान रचत आहेत,
- आमचा नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा राहिला आहे आणि पुढे हे राहील, गरीब, गरजू मुलांच्या भविष्याचा विचार करून अल्प आणि मोफत शिक्षण प्रदान करून विकासात मोठा वाटा देणाऱ्या TIMS शाळेच्या जागे विषयीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, शाळा बंद होऊन मुलांचे भविष्य धोक्यात येणार नाही याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू” .
खादी एक्सप्रेसने जेव्हा या बाबत पालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली :-
” TIMS ही शाळा कमी फी आकारून मुलांना चांगल्या वातावरण मध्ये उत्तम शिक्षण देते, तसेच गरीब, गरजू विद्यार्थ्यांना येथे मोफत शिक्षण प्रदान केले जाते, परंतु नाजिया खान आणि सलीम मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारी मुळे आमच्या मुलांचे भविष्य आम्हाला धोक्यात दिसत आहे”
- ” सदर शाळा आम्हाला जवळ आहे, शिक्षण ही उत्तम देते परंतु शाळा बंद झाली तर दुसऱ्या लांब शाळेत लगेच दखल करणे आम्हा शक्य नाही, भरमसाट फी आम्ही भरू शकत नाही”
-” आमची मुले बऱ्याच वर्षा पासून या शाळेत उत्तम शिक्षण घेत आहे, शाळे विरोधात आमची कोणतीही तक्रार नाही”
मुळात शाळेकडून अधिकृत परवानगीसाठी लागणाऱ्या वेळेचा आपण कसा फायदा करू शकतो या बेतात असणाऱ्या या खंडणी खोरांमुळे लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे, मुळात या तक्रारी, खंडणी, वाद, लालचे मुळे सध्या या शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणावर टांगती तलवार आहे,
शासकीय कामात अडथळा….
फसवणूक, धमकी, खंडणी याचा वारसा जपत उदरनिर्वाह करण्याच्या प्रयत्नात समाजातील चांगल्या, विकासाकडे नेणाऱ्या गोष्टींना नामशेष करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे झाले आहे, मुळात या मोकाट लोकां मुळे शासनाच्या अत्यावश्यक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे, काय अधिकृत काय अनाधिकृत याची माहिती मुळात शासनाला आहे आणि त्या संबंधी नियमांतर्गत योग्यती कारवाई करणे हे शासनाचे काम आहे, जे योगरित्या होत ही आहे पण लोणी खाण्याच्या बेतात असणाऱ्या लोकांच्या नसत्या लुडबुडी मुळे फक्त वैयक्तिक द्वेष भावनेतून किंवा फक्त त्रास देण्याच्या हेतूने शासनाच्या कामात अडथळा निर्माण होऊन शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयाचा वेळ वाया जात आहे,
गुन्हा दाखल होणे गरजेचे…
मागील प्रकरण पाहता काही दिवसापूर्वीच कोंढवा परिसरातील बांधकाम व्यावसायिकां कडून पैसे लूबडण्यासाठी म्हणजेच खंडणीसाठी तक्रारींचा आधार घेऊन धमकावून पैसे लुबाडणाऱ्या खंडणी खोराचे कोंढवा पोलिसांनी चांगलेच मुसक्या आवळून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता, आता अश्याच घटना पुन्हा तोंड वर काढत आहे हेच चित्र दिसून येत आहे, जर असे आहे तर पोलिसांमार्फत लवकरात लवकर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे, एक आरोपी आपल्या गैरहेतू साध्य करण्यात यशस्वी झाला तर त्याच पावलांवर पाऊल देत शासनाच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन, तक्रारी आणि खंडणीवर जगणारी नवी पिढी जन्माला येण्यास वेळ लागणार नाही,
खादी एक्सप्रेसने या पूर्वी देखील कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्याय, त्यांना धमकावून होणाऱ्या चुकीच्या पैशांच्या मागणी विरोधात, खंडणी खोरांचा प्रकार निदर्शनास आणून त्या विरोधात आवाज उठवला होता .. ज्यामुळे हि प्रकरणे बऱ्याच प्रमाणात कमी देखील झाली… आणि पर्यायाने उदरनिर्वाह बंद होताच लहान मुलांचे भविष्य पायदळी तुडवत जर प्रयत्न होत असेल तर या लोकांविरुदध लवकरात लवकर कडक कारवाई होऊन या गैरप्रकार आळा घालने अत्यंत गरजेचे आहे…