(कोंढवा) हाजी फिरोज शेख – विद्यार्थ्यांनो परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा, १०वी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा..!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : कोरोना काळातील अभ्यासक्रम, परीक्षा पाहता १० वी बोर्डाची परीक्षा अखेर ऑफलाईन १५ मार्च पासून सुरू झाली, परीक्षेचा विषय आला की विद्यार्थ्यान मध्ये ताण निर्माण होतो, परीक्षा हा शब्दच मुळात परीक्षार्थींना ताण देतो, परीक्षेच्या काळात मनातील परिक्षेविषयीची धकधक, दडपण हे साहजिक आहे, आठवेल त्या प्रमाणे वारंवार अभ्यासाची तयारी देखील चालू असेल, पण हेही लक्षात ठेवा या पूर्वी जितके परीक्षा तुम्ही यशस्वी रित्या दिल्या त्या पैकीच ही एक परीक्षा आहे फक्त “बोर्डाची परीक्षा” या नावाला घाबरून खचून न जाता आपल्या परिश्रम, चिकाटी वर विश्वास ठेऊन आनंदात परिक्षा द्या, निर्धार केला की अशक्य असे काही नाही. १०वी परीक्षेसाठी तुम्ही वर्षभरा पासून तयारी करत आहात अभ्यास करत आहात, परीक्षेच्या आदल्या दिवशी तणावात येवून एकच जागी बसून एकलग सराव, पाठांतर करण्याचा प्रयत्न केला तर या गोंधळात आधीच्या सरावावर देखील परिणाम होतो, मन आनंदी ठेऊन सरावात थोडी थोडी विश्रांती घेऊन अभ्यास करा, सर्व काही पाठ व्हायलाच हवे असे नाही जरी ७५-८०% अभ्यास झाला तरी तो पूर्ण समजून, व्यवस्थितरित्या करा सर्व पाठ करण्याच्या प्रयत्नात त्या 80% केलेल्या सरावावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या, थोडक्यात “परीक्षेला स्पर्धा समजून नका”, वेळेचे भान ठेवावे. त्यामुळे व्यवस्थापन होईल. गोंधळ होणार नाही. ताण येणार नाही.जेव्हाचा अभ्यास तेव्हाच करा शांतपणे तयारी करा.स्वतःला हीन, दुबळे, समजू नका, एखादा पेपर अवघड गेला तरी खचून जाऊ नका तोच विचार वारंवार करून कोणताही वेडावाकडा पाऊल उचलू नका,जीवनात संधी या मिळताच कोणत्याही प्रकारचा दडपण आला तर तो आपल्या परिवार, मित्रांसोबत शेअर करा,विषयाबद्दल काही अडचण आल्यास शिक्षकांशी बोला, स्वतःला त्रास न देता आनंदाने परीक्षा द्या, परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळो, उत्तम यश प्राप्त व्हावे याच सदिच्छा,आत्मविश्वास ठेवा व अधिक वाढवा, यश तुमचेच आहे,अश्या शब्दात ऑल कोंढवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष हाजी फिरोज शेख यांनी विद्यार्थ्यांना उत्तम यशप्राप्तीसाठी परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या..

  • विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनी देखील भूमिका सकारात्मक आत्मसात केली पाहिजे – आजतर अगदी पहिल्या वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत परीक्षेचा ताण त्यांच्या डोक्यावर घर करून बसलेला असतो. त्या धाकाने अनेक विद्यार्थी स्वतःचे नुकसान करून घेतात. त्यात आज आपण रोज वृतपत्रातील बातम्या वाचतो. परीक्षांच्या दिवसांमध्ये हे आत्महत्या करण्याचा प्रमाण आपल्याला दिसते. हे का घडते? विद्यार्थ्यांवर कोणते दडपण येते याचा विचार व्हायला हवा. शोधाअंती विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती, पालक काय म्हणतील ? याची भीती त्यामुळे आधीच विद्यार्थी तणावग्रस्त होतो. म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात समन्वय साधायला हवा, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसोबत हितसंबंध जोपासायला हवेत, त्यांचे मित्र बनायला हवे,जेणे करून त्याच्या मनातील दडपण, भीती ते शेअर करू शकतील..

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल