कोंढवा शेहजाद प्रकरण -२ कार्यकर्त्यांनो मढयावरच लोणी खाणे सोडा..!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : खादी एक्सप्रेस ने कालच आपल्या समोर कोंढवा मधील दुर्देवी सत्यघटना ज्यात प्रशासनाच्या हलगर्जी, आणि निष्काळजी पणामुळे प्रभाग क्र. २७, गल्ली नं. १० कुबा मस्जिद जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उघड्यावर पडलेल्या खुल्या तोंडाच्या वीज वहिनी तारेचा झटका लागून कश्याप्रकारे येथील ४ वर्षीय शेहजाद अमीर सय्यद ( प्रभाग २७, गल्ली नं १०, कोंढवा) या मुलाला आपला जीव गमवावा लागला ही बातमी मांडली, या संदर्भात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शेहजादच्या कुटुंबियाना शासनाकडून सहाय्यता मिळावी, या मागणी साठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने ७ मार्च रोजी सकाळी ११ पासून बेमुदत सत्याग्रह करण्याचा इशारा देखील दिला आहे, सोबतच इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे अध्यक्ष असलम बागवान यांनी या संदर्भात आज कोंढवा पोलिस स्थानकात निवेदन दिले आहे. ज्या अधिकारी व ठेकेदाराच्या, जेसीबी चालक, लाईटमन ,वायरमन, वीज मंडळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे निष्पाप चिमुरड्याला जीव गमवावा लागला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ( नियमांचे उल्लंघन केलेले असताना जीवघेणा अपघात झाल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येतो) मागणी देखील बागवान यांनी केली, कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला खरा पण पुढील कारवाई केव्हा ? दोषींना अटक केव्हा ? या प्रश्नांना उत्तर केव्हा मिळेल या पलीकडे सदर दुर्देवी घटनेचा उपयोग काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या फायद्यासाठी वापर करून घेत आहे.
शेहजाद च्या मृत्यूला कारणीभूत कोण…?
या घटनेचा जबाबदार कोण..?
शेहजाद च्या कुटुंबीयांना कश्या प्रकारे मदत करू शकतो की जेणे करून त्यांचे हे दुःख काही अंशत का होईना कमी होईल..?
दोषींना शिक्षा कशी होईल…?
हे प्रश्न समोर असताना देखील या परिसरातील, लोकांचे हित पाहणारे, सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लोक या प्रश्ना कडे दुर्लक्ष करून आपला यातून काय फायदा होईल याचा विचार करतआहे, निवडणुकीच्या काळात या घटनेचा उपयोग करुन समोरील विरोधी पक्षावर या घटनेचा खापर फोडून, आपल्या फायद्याच्या वाटेत येणाऱ्या काट्याला काढण्याचा प्रयत्नात मग्न आहेत, एकमेकांवर आरोप करून, कश्या प्रकारे या घटनेस ते कारणीभूत आहे हे साध्य करण्याच्या प्रयत्नात लोक लागलेले आहेत, यालाच म्हणतात मढया वरच लोणी खाणे पण हे लोक कदाचित विसरले आहेत की आपण मनुष्य जातीत जन्मलो आहोत..थोडी तरी माणुसकी दाखवून फायद्याचा विषय सोडून..कार्यकर्त्यांनो, समाजाचा चांगला विचार मनात ठेवणारे लोक म्हणवून घेणारे – आपल्या प्रभागात काय काम चालू आहे..ते काम कोणाकडून केले जात आहे- आपल्या विभागात सुरू आलेल्या कामाचा तेथील रहिवासी नागरिकांना फायदा आहे का नुकसान..
त्यांना सदर कामातून काही अडथळा होत असेल काही प्रश्न असेल तर ते जाणून घेणे.
चिमुरड्याच्या मृत्यचा फायदा करण्यापेक्षा त्याला व त्याच्या कुटुंबीयांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करणे
सदर शेहजाद घटनेच्या जबाबदार लोकांवर लवकरात लवकर कारवाई होईल या साठी प्रयत्न करणे
दोषींना, घटनेला जबाबदार लोकांना केव्हा शिक्षा मिळेल, जेणे करून पुन्हा दुसऱ्या शेहजादला आपला जीव गमवावा लागणार नाही…या कडे लक्ष देणे आवश्यक आहे असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे