कोंढवा-मिठानगर रस्त्यातील खड्डयांची दुरुस्तीकामी “आठवण” अर्ज दाखल…!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : कोंढवा खुर्द मिठानगर मधील रस्त्याची अक्षरशः दयनिय अवस्था झालेली आहे..मिठानगर रस्त्याकडे नागरिकांना विचार करूनच वळण घ्यावे लागत आहे…आणि ज्यांच्या कडे त्याच रस्त्यावरून जाण्याशिवाय पर्याय नाही त्यांना खड्ड्यात लपलेल्या रस्त्या सोबत लपंडाव खेळत, खड्ड्यात रस्ता दिसला तर पुढे प्रवास करत जावे लागत आहे, मिठानगर हा रस्ता मुळात कमी रुंदीचा आहे त्यात रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्री करणारे विक्रेते ज्या मुळे गाडी तर दूर नागरिकांना येण्या जाण्या साठी रस्ताच उरत नाही ज्यात भर म्हणून अवजड वाहने, डीप्पर, ट्रक या रस्त्यावर आले तर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे…मिठानगर रस्त्यावर गाडी वरून प्रवास करणे म्हणजे एक तर पाठीचा मणका सरकणार नाहीतर गाडीची दुरावस्था होणार हे अटळ….
ज्या बिचाऱ्या रस्त्याच्या अवस्थे बाबत परिसरातील नागरिक मेमेस, रिल्स, आणि मजेदार व्हिडिओ बनवत आहेत या आशेने की पुणे महानगर पालिका कदाचित दखल घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी कृपादृष्टी करेल…पण अजून तशी कृपा काही झाली नाही…या पूर्वी नवीन नाम मात्र रस्त्याचे काम करण्यात आले खरे पण त्या रस्त्याचे आयुष्य १ महिन्याच्या वर टिकले नाही….याचे मुख्य कारण म्हणजे संबंधी कॉन्ट्रॅक्टर कडून रस्त्यासाठी वापरले गेलेले निकृष्ट दर्जाचे सामान..पालिकेने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्यती कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे, वारंवार तक्रारी दखल करूनही महानगरपालिके कडून अद्याप रस्ता दुरुस्तीसाठी कोणतीच दाखल घेतली गेली नाही…नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मिठानगर रस्ता दुरुस्ती साठी खादी एक्सप्रेसच्या संपादकांनी आज पुणे महानगर पालिकेत रीतसर अर्ज (WA94477) दाखल केला असून अता रस्त्याच्या कामाला सुरवात कधी…? करिता संबंधित रस्ता विभाग अधिकारी राजश्री बाने यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अद्याप संपर्कास कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही…आशा आहे की या आठवण तक्रारीची पुणे महानगर पालिके कडून लवकरात लवकर दाखल घेऊन रस्ता दुरुस्तीचा नारळ फुटेल….