कोंढवा : मालकावर निशाणा अन्…..ग्राहकांवर हत्याराने वार…लक्ष्मीनगर लॅबमध्ये गुंडांचा थरार….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): वेळ रात्री ९:४०, सोमवार दि.२३ रोजी, लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक, येथील पुना पॅथालॉजी लॅब मध्ये घडलेल्या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, लॅब मध्ये अचानक काही गुंड लोकांनी हत्यारे घेऊन प्रवेश करत जो दिसेल त्यावर धारधार शस्त्राने वार करण्यास सुरवात केली ज्या मध्ये लॅब मध्ये आपल्या लहान मुलासह लॅब टेस्ट करिता आलेल्या सुरेश मोतीलाल सहा (वय अं. 40 वर्षे, रा. येवलेवाडी पुणे) हे गंभीर जखमी झाले असून लॅब मधील स्लायडिंगचे दरवाजे, काऊंटरवरील तसेच पार्टीशनची काच धारदार हत्याराने फोडुन लॅबचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून तेथुन पळ काढला. दाखल फिर्यादवरून कोंढवा पोलिसांनी आरोपी १) अक्षय प्रताप निकम , २) आशिष दूधणीकर व ३) चिरज घेले, सर्व रा. गोकुळनगर पुणे यांच्या विरोधात गुन्हा (१०९१/२०२३) नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडिओ

घटनेचे नेमके कारण : पुना पॅथालॉजी लॅब सुरू झाल्या पासून सुखसागर येथील मेडिको लॅबचा व्यवसाय ठप्प झाल्याने, या गोष्टीचा राग मनात धरून मेडिको लॅब चे मालक अक्षय प्रताप निकम यांनी पुना पॅथालॉजी लॅबचे मालक योगेश सोपान घोडके, नितीन लक्ष्मण गुळुमकर, चेतन विठ्ठल भिसे, य सिराज बाबुलाल शेख यांना ‘ माझे व्यवसायाचे आड आलात तर मी तुमच्या सर्वांकडे पाहून घेईल’ म्हणून धमकवित होते… त्यातूनच अक्षय प्रताप यांनी आशिष दूधणीकर व चिरज घेले या गुंडामार्फत सदर लॅबवर हल्ला घडवून आणला होता.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल