कोंढवा -‘बिर्यांनी न दिल्याने कोयत्याने हल्ला…”अश्रफ नगर येथील थरारक घटना सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद..व्हिडिओ पाहा..

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुण्यात कोयता गँगच्या व्हायरल गुन्हेगारीवर पोलिसांनी लावलेली शक्कल, कोयता गँगची धिंड, याचा काडीचाही परिणाम झालेला दिसत नाहीये, एखाद्या महामारी प्रमाणे वाढणाऱ्या या वृत्तीचे काही लोक कोंधवा मध्ये ही निष्पन्न झाले आहे, एका शुल्लक कारणाने कोंधव्यातील हॉटेल चालकावर ३ युवकांनी कोयत्याने हल्ला केला ज्या मध्ये हॉटेल चालकासह त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या त्याचा मुलगा व हॉटेल मधील कर्मचाऱ्यांवर देखील कोयत्याने वार करून जखमी केले, यावरच न थांबता या आरोपींनी हॉटेल मधील खाद्य पदार्थ रस्त्यावर फेकून हॉटेल मालकाच्या गाडीचे देखील नुकसान केले आहे.दि. १६ ऑक्टोंबर (सोमवार) रोजी, गल्ली नंबर 3, अश्रफ नगर, सर्वे नंबर 5, कोंढवा, पुणे येथील ” ख्वाजा गरिब नवाज ” या नावाने हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अब्दुल रहीम मुश्ताक अली, यांनी नेहमी प्रमाणे सकाळी ७:०० च्या सुमारास आपले हॉटेल उघडले आणि नेहमीचेच काम कर असताना तेथे इसम नामे आयान शेख( वय १९ वर्ष ), अली शेख ( वय १८ वर्ष ), व अर्श मुलानी ( वय २० वर्ष ) (सर्व रा. कोंढवा खुर्द पुणे) आले आणि त्यांनी बिर्याणी आहे का आम्हाला बिर्याणी हवी आहे असे विचारले असता अब्दुल रहीम मुश्ताक अली यांनी सकाळी बिर्याणी नाही, फक्त नाष्टा तयार आहे, असे बोलताच वरील तीनही इसमांनी अब्दुल रहीम मुश्ताक अली यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली, आणि ‘ अभी तेरे पास जितने पैसे है वो निकाल ‘ असे बोलून जबरदस्तीने पैशाची मागणी करण्यास सुरवात केली असता अब्दुल रहीम यांनी पैसे देण्यास नकार देताच यापैकी अली शेख याने त्याचे कमरेला लावलेला कोयता काढला आणि अब्दुल रहीम मुश्ताक अली यांच्यावर वरील तीनही जणांनी हल्ला चढविला.

व्हिडिओ – १
व्हिडिओ – २

त्यावेळी अब्दुल रहीम यांनी बचावासाठी हात पुढे केला असता त्यांच्या डाव्या हाताच्या मनगट व कोपराच्या मध्य भागी कोयता लागुन जखम झाली, सदर वेळी अब्दुल रहीम यांचा मुलगा आणि त्यांच्या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अब्दुल यांना वाचविण्यासाठी पुढे गेले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करून जखमी केले, त्याच ठिकाणी असलेल्या अब्दुल रहीम यांच्या दुचाकीचे नुकसान करत हॉटेल मधील नाष्ट्याचे पदार्थ रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले सदर सर्व घटना सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाली असून. अब्दुल रहीम यांच्या तक्रारवरून वरील तिन्ही आरोपी विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेने कोंढवा परिसरातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, कुठून येवून कोण कोयता काढून हल्ला चाढवेल भरोसा नाही अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे, या कोयता महामारी वृत्तीच्या लोकांची संख्या वाढण्या आगोदर पोलिसांनी लवकरात लवकर दाखल घ्यावी हीच मागणी कोंढव्यातील नागरिक करत आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल