कोंढवा- नवीन प्रसूतीगृहाची मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन परवीन हाजी फिरोज यांची विकासासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : नगर सेवकाची खरी व्याख्या काय..? या प्रश्नाला सर्वोत्तम उत्तर म्हणजे कोंढवा खुर्द येथील पुणे म.न.पा चे नगरसेवक परवीन हाजी फिरोज शेख, परिसराच्या विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करणारे व्यक्तिमत्व अशी जागा प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे नगरसेवक परवीन शेख यांनी आपल्या भागातील विकास कामात आणखीन भर पाडली आहे, सर्वे नं. ४५-४६ कुमार पृथ्वी जवळ कोंढवा खुर्द येथे नवीन प्रशस्त, सर्व सोई सुविधा उपलब्ध असलेल्या मां खदीजा (र.अ) प्रसूती गृहाची उभारणी केली ज्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:३० सुमारास होणार आहे.

साधारणपणे निवडून आल्यावर आता पाच वर्षांत पुन्हा नगरसेवक मतदारांना तोंड दाख‍त नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पण दुसरीकडे परवीन शेख यांनी एक नगरसेवक या शब्दाची, पदाची जाण ठेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, आपल्या परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे नागरिकांच्या समस्या- प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविणे, नागरिकांसाठी तत्पर आणि कार्यक्षम असे वक्तव्य असलेले नगर सेवक म्हणजे परवीन शेख आपल्या भागातील प्रत्येकाच्या मनात आपल्या सेवेतून एक उत्तम व्यक्तिमत्त्वचे स्थान त्यांनी निर्माण केला आहे, मागील १० वर्षा पासून ऑल कोंढवा सोशल फाउंडेशन ( All kondhwa Social Foundation) मार्फत सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण केले तसेच आपल्या विकास कामातून कोंढवा परिसराला एक नवे रूप दिले आहे विकास कामात प्रभाग क्र. २७ ब मधील विकास कामे जसे 

– कोंढवा पंपिंग स्टेशन वर नवीन 75 एचपी चे पंप बसवण्यात आले ज्यामुळे भाग्योदय नगर मिठा नगर शिवनेरी नगर व इतर परिसराच्या पिण्याचे पाणीचे प्रश्न सुटले.

 –  प्रभाग 27 हा डोंगराळी भाग असल्यामुळे रस्ता चढ-उताराचा आहे. नागरिकांना भाग्यदय नगर ते शिवनेरी नगर पाई जाण्याकरिता भाग्योदय नगर गल्ली क्र 7, 8, 4, 28, मदिना मस्जिद, जामा मस्जिद, माविया मस्जिद व इतर परिसरात, नवीन पायऱ्या व रेलिंग बसवण्यात आले. 

-प्रभागातील नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेचे अमेनिटी स्पेस जाग्यावर सिविक कल्चर अंड कमुनिटी सेंटर उभारण्याचे काम चालू आहे.
 – कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मध्ये ओटी साठी नवीन जनरेटर बसविण्यात आले व इतर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले.
 त्या शिवाय महामारीच्या म्हणजेच कोरोना च्या काळात तातडीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कै. मीनाताई ठाकरे दवाखान्यामध्ये कोविद 19 सेंटर उभारले त्या शिवाय प्रभागात सॅनिटायझर स्टॅन्ड मास मोठ्या प्रमाणात वाटप केले
 –  कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण सेंटर चालू करण्यात आले.
 – सुरक्षेच्या दृष्टीने प्रभागात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून त्याचा आउटपुट कोंढवा पोलीस स्टेशन येथे जोडण्यात आला.
 – साईबाबा नगर येथील मौलाना अबुल कलाम उर्दू शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
 –  सर्वे नंबर 42 43 व परिसराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता कुमार पृथ्वी ते जेके पार्क पर्यंत पिण्याचे पाणी चे नवीन एम एस एक्सप्रेस लाईन टाकण्यात आली.
 –  प्रभागातील नागरिकांना साठी एक सुसज्ज स्मार्ट बस स्टॉप शितल पेट्रोल पंप जवळ बनवण्यात आले.
 –  मिठा नगर मुख्य रस्ता वेस्टनड बेकरी ते राजीव गांधी शाळा पर्यंत नवीन एम एस ची पिण्याचे पाणी ची एक्सप्रेस लाईन टाकण्यात आली.
 –  भाग्योदय नगर मिठा नगर साईबाबा नगर शिवनेरी नगर व विविध ठिकाणी नवीन पिण्याचे लाईन टाकण्यात आले.
 – प्रभागात विविध ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर व आर एम ओ युनिट बसवण्यात आले.
 –  प्रभागात विविध ठिकाणी नवीन लाईटचे केबल टाकण्यात आले व केबल भूमिगत करण्यात आले.
 –  प्रभागात विविध ठिकाणी पद दिवे व हायमस बसवण्यात आले.
 –  सर्वे नंबर 42, 43 याठिकाणी मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्यात आली.
 – भाग्योदय नगर गल्ली क्र 1, 2 आणि 3 ला वारंवार होणाऱ्या ड्रेनेजची समस्या सोडविण्याकरिता भाग्यनगर मुख्य रस्त्यावर मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे.
 – शिवनेरी नगर मध्ये उभारण्यात आलेली 35 लाख लिटरचे पिण्याचे पाणीचे टाकीचे वारंवार पाठपुरावा करून पूर्ण करून घेतले.
 – प्रभागातील नुरानी कबरस्तान मध्ये विविध देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले.
 -प्रभागात विविध ठिकाणी नवीन लाईन टाकण्यात आली व डांबरी रस्ते आणि कॉंक्रीट रस्ते बनवणे अश्या अनेक अनेक कामातून त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडली त्यांच्या या सेवाभावी वृत्ती मुळेच कोंढवा खुर्द चे नागरिकां कडून नगरसेवक म्हणून परविन हाजी फिरोज शेख यांनाच पसंती दिली जात आहे..


 

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल