कोंढवा : नगरसेवक हाजी गफुर पठाण कडून मोकाट प्रथेत न्यू अपडेट….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : नेते, नगरसेवक, अधिकारी, यांच्यावर कार्यकर्ते अन् नागरिक किती प्रेम, आदर, करतात हे दाखविण्याचा दिवस म्हणजे त्या व्यक्तीचा वाढदिवस …८ दिवस आधीच जागोजागी मोठमोठे ब्यानरबाजी तून अलार्म देत, डी.जे चा दणदणाट, नाच – गाणी, या तून प्रेम आदर दाखवताना, सामान्य नागरिकांना होणारा त्रास, रस्त्यावरील ट्रॅफिक, अपघात, ध्वनिप्रदूषण, सामान्य नागरिकांना होणारा त्रास इ. या कडे कोणाचं लक्षच जात नाही आणि हिच परंपरा, प्रथा भलतीच तेजीत आहे, आणि हीच गोष्ट पाहत, मोकाट प्रथेला फुल स्टॉप लावण्यासाठी कोंढव्याचे नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण (नगरसेवक पुणे म.न.पा.) यांनी १४ ऑक्टोंबर रोजी असलेला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, ” आपले प्रेम, आदर, आशीर्वाद, नेहमीच माझ्या पाठीशी आहे, तरी वाढदिवसाची कोणतीही बॅनरबाजी, आतिषबाजी, न करण्याची विनंती करत, माझी आतिषबाजी प्रभागात विकासकामांच्या रुपाने करुन आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न मी करणार.! ”
या शब्दात त्यांनी मोकाट प्रथा बदलण्याच्या आपल्या पहिल्या पावलाची माहिती दिली….नेम – फेम चे जाळ पायदळी तुडवत नेहमीच सामाजिक कार्य, परिसरात लहान मोठे प्रश्न सोडवत, प्रगतिशील बदलासाठी झटणारे, आपल्या कामातून बोलणारे नगर सेवक म्हणून नेहमीच चर्चेत असणारे हाजी गफुर पठाण यांच्या या निर्णयाची मोठी प्रशंसा होत आहे.
Tas pan tumhi haji aahat he sagla ny karyala pahije aani lokanchi seva keli pahije